चारोळ्या-ग्रामस्थांच्यामागण्याअमान्यझाल्या,सरपंचउपसरपंच्याच्या खुर्च्यापेटविल्यI

Started by Atul Kaviraje, May 31, 2022, 01:09:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    विषय - सरपंच उपसरपंच्याच्या खुर्च्या पेटविल्या
                      व्यंग्य विनोदी मार्मिक राज-कारणी चारोळ्या
      "ग्रामस्थांच्या मागण्या अमान्य झाल्या,सरपंच उपसरपंच्याच्या खुर्च्या पेटविल्या"
                                         (भाग-3)
    --------------------------------------------------------------------


(१०)
आज त्या खुर्चीलाच सारे दोष देत होते
जिच्यामुळेच तर ते एकमेकांचा रोष ओढवित होते
खुर्चीच नसती तर हे वादच झाले नसते,
लोक एकमेकांशी उभ्या-उभ्या तळमळीने बोलत होते.

(११)
खुर्च्यांना कायमचीच दिली गेली भविष्यात तिलांजली
जनतेच्या प्रश्नांची साऱ्या यापासून उत्तरे मिळत गेली
सरपंच,उपसरपंचानी सुटकेचा टाकला होता निश्वास,
मते नकोत, पण ही खुर्चीची ब्याद तर कायमची  गेली.

(१२)
ही खुर्ची वस्तू-संग्रहालयात आरामात काच-पेटीत विसावली होती
नेत्यांची नेतेगिरी आता पूर्णपणे लयास गेली होती
जिच्यामुळे व्हायचे मोठे महाभारत तेव्हा,
ती आता,लोकांचे रामराज्य पाहून सुखावत होती.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.05.2022-मंगळवार.