काळजात तुझ्या......

Started by ranjit sadar, May 31, 2022, 07:11:12 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

!काळजात तुझ्या!

काळजात तुझ्या
राहूदे ना ग मला
देहावरून जीव
लावेल राणी तुला.

तुझ्या सुंदरता
पुढे दिसे बाहुला
लाज वाटते मला
सरकतो बाजूला.

बायको बन पेटू
आपण दोघे चुला
मी जास्वंत ग तू
गुलाबाच्या फुला.

प्रेमाचा रस्ता करू
आपण दोघे खुला
काळजात तुझ्या
राहूदे ना ग मला.

(कवी रंजीत अंबादास सदर.)
रा बोईसर जि पालघर