वाच..वाच..

Started by @गोविंदराज@, June 01, 2022, 12:02:19 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

वाच...वाच..तू वाचत राहा...
थेंबे थेंबे तळे साचत राहा...

कर सामना तू संकटांचा निर्भीड...
डोळ्यात डोळे घालून तू आता भीड...

होतील बहुदा अनेक विरोध ..
करू नकोस तू कसलाच क्रोध...

मरगळ सगळी झटकून टाक...
एक एक पाऊल तू आता पुढेच टाक...

कळू दे साऱ्यांना तुझ्यात दडलेलं तुफान.
तुझ्या कर्तृत्वाला येऊ दे आता उफान...

हळू हळू सगळं पादाक्रांत करायचं आहे...
आकाश गंगेवर स्वतःच नाव कोरायच आहे...

गोविंदराज
३०/०५/२०२२