(विचारांचं समुद्र)

Started by ranjit sadar, June 03, 2022, 12:51:28 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

विचारांचं समुद्र

एव्हडं माश्यांच समुद्र
पण मीच का काठावर
लायकी नाही रे तुमची
येण्यास माझ्या वाटावर

मी बीज एकच पेरतो
पण येते शेती पाटाभर
विचाराच्या दुनियेत मी.
चालतो तरंगत लाटावर

जीभ माझी शुद्ध बोलें
वाणी माझ्या दातावर
कोहिनुरी काव्य मी रचे
माझ्या कोमल हातावर

कधी मन माझे जाई हे
एका सुंदरश्या घाटावर
विचार करून परत येई
ते घरच्याच ह्या ताटावर

कविता लिहायला जाते
मन पाण्याच्या माठावर
शब्द आणते वेचून मन
डोक्यात माझ्या साठाभर

मेहनत करत आहे मीच
रोज झोपण्यास खाटावर
आता पोहून येणार मीच
विचारांच्या ह्या लाटावर

कवी रंजित अंबादास सदर.
रा : बोईसर जि :पालघर