मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-16

Started by Atul Kaviraje, June 07, 2022, 12:54:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    मला आवडलेल्या चारोळ्या
                                       चारोळी क्रमांक-16
                                  -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --हा  नवं -चारोळीकार  प्रेमात  पडल्यापासून  इतका  भाव -विभोर  झाला  आहे , इतका  उत्कट  झाला  आहे , इतका  शिगेस , टिपेस  पोहोचला  आहे , की  त्याला  हे  जग  अति -सुंदर  भासू  लागले  आहे . अतिशय  आगळे -वेगळे  भासू  लागले  आहे . त्याच्या  चारोळीतील  हा  प्रेमी  त्याच्या  शब्दात  काय  म्हणतोय  ते  ऐकुया . तो  म्हणतोय , की  हे  सखे  तू  माझ्या  जीवनात  आल्यापासून  माझे  सारे  जीवनच  काय  तर  हे  जगच  बदलल्याप्रमाणे  भासू , वाटू  लागले  आहे . माझ्या  प्रेमाचा  झुला  आभाळात  उंच  उंच  झुलू  लागला  आहे . आणि  या  झुलत्या  झुल्याने  मला  ते  सुंदर  दृश्य  गोचर  केले  आहे . ते  आभाळ , ते  आसमान , ते  आकाश , मला  आता  सुवर्णमयी  भासू  नव्हे  तर  दिसू  लागले  आहे . तुझ्या  प्रेमानेच  तर  मला  हा  सुवर्ण -क्षण  दाखविला  आहे . आ -क्षितिज , हे  आकाश  मला  सोनीयाने  झाकल्यापरीस वाटतंय , त्याची  कनक -कांती , सुवर्ण -झळाळी , इतकी  गडद  होत  आहे , कि  व्यापून  टाकता  टाकता  ही  सायंकाळ , संध्याकाळ  सोन्याचेच  रूप  घेऊन  मावळते  कि  काय , असे  दृगोच्चर  होत  आहे . बस  सगळीकडे , साऱ्या  दिशा  व्यापून  टाकणारे  हे  सोनेरी  संगीत , मला  सये , तुझ्या  प्रेमानेच  दाखवून  दिले  आहे , ऐकविले  आहे .

     पुढच्या  ओळी  तर  ह्या  चारोळीचा  अगदी  कळस  गाठून  आहे . हा   प्रेमी  आपल्या  प्रेमिकेस , म्हणतोय , की  तुझे  असणे , तुझे   वावरणे , तुझे  बिलगणे , तुझे  आलिंगणे  मला  इतके  व्यापून  गेले  आहे , तुझे  बिलखणे , तुझे  हसणे , कधी  कधी  तुझे  रुसणे , रडणेही  मला  इतके  जवळचे  वाटू  लागले  आहे . तुझ्या  या  परीस -स्पर्शाने  माझे  सारे  जीवनही  सोन्याचे  झाले  आहे .माझ्यात  हा  आमूलाग्र  बदल  घडवणारी तू  माझ्या  आयुष्यात  केव्हा  सोन्याच्या  पावलांनी  आलीस  अन  गळ्यातली  सोनियाची  माळ  होऊन  राहिलीस , पहा  मला  हे  कधी  कळलेच  नाही . सखे , सये , अशीच  तू  माझी  होऊन  राहा , मला  आयुष्यभर  साथ  दे , सारं  जग , सारी  दुनिया , तू  आल्यापासून  बदलून  गेली  आहे , अशी  तू  सतत  सोबत  राहा . माझ्या  गळ्यातील  सोन्याची  माळ  होऊन  राहा . माझे  जीवन  सोनेरी  करून  राहा . माझे  असणे ,अस्तित्त्व  सुवर्णाचे  करून  राहा .

=============
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ...
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ.
=============

--नव-चारोळीकार
-----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.06.2022-मंगळवार.