मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-17

Started by Atul Kaviraje, June 08, 2022, 12:58:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   मला आवडलेल्या चारोळ्या
                                      चारोळी क्रमांक-17
                                 --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --हा  नवं -चारोळीकार  आईची  माहिती , महानता  वर्णन   करताना   थकत  नाही , असे  या  चारोळीतून  लक्षात  येत  आहे . आयुष्यात  त्याने  खूप  भोगले  आहे . समज  आल्यापासून  त्याला  कळले  आहे , हा आहे  एक  खडतर  प्रवास , अथक , अगदी  न  संपणारा , खाच -खळग्यांनी  , काट्या -कुट्यानी   भरलेला . इथे  गुलाबाच्या  पाकळ्यांच्या  पायघड्या  नाहीत , तर  उबड -खाबड , पाऊलवाट  आहे . इथे  सोपे  काही  नाही , सहज  काही  नाही , तर  एक न सुटणारा  गुंता  आहे , खडतर , कठोर , कठीण  परीक्षा  आहे . सहसा , सोप्या  वाटणाऱ्या  वाटा , रस्तेही , पुढे  जाऊन  पाहता , दूरगामी  होऊ  पाहत  आहेत . थोडक्यात  हे  विचार  मनात  येताच , हे  प्रत्यक्ष  अनुभवास  येताच , त्याची  पावले  क्षणभर  थांबली  आहेत , रेंगाळली  आहेत . पुढे  जाऊ  की  नको  याच  संभ्रमात  तो  पडला  आहे .

     पण  अचानक  त्याला  कळून  चुकलंय , त्याच्या  लक्षात  ही  गोष्ट  आलीय , की  यापूर्वीही  अश्याच  दुर्धर  प्रसंगातून तो  गुजरला होता . तेव्हा  त्याच्या  आईनेच  तर  त्याला  धीर  दिला  होता . त्याला   साऱ्या  संकटाशी  मुकाबला  करण्यास  प्रवृत्त  केले  होते , लढण्यास  बळ  दिले  होते . आतापर्यंत  आईनेच  तर  त्याला  सोबत  केली  होती . त्याच्याबरोबर  ती  सदैव  होती.  त्याची  सुरक्षा,  त्याची  ढाल  होऊन  राहिली  होती . आता  ती  त्याच्या  जीवनात  नाहीय . केव्हाच  देवाघरी  गेली  आहे . राहून  राहून  त्याला  आता  आईची  आठवण  येऊ  लागली होती . आईने  त्याला  दिलेले  आशिष , आशीर्वाद  त्याला  आता  धीर  देऊ  लागले  होते . आई  नाही  तर  तिचे  आशीर्वाद  तर  माझ्यासोबत  आहेत , त्याचे  मन  हे  त्याला  निक्षून  सांगत  होते . आणि  पाहता -पाहता , निराशेची , असहाय्यतेची , नाउमेदीची  भिंत  क्षणार्धात  खचून, कोसळून  गेली . त्याला  त्या  जागी  उमेदीचा , उत्साहाचा , धीराचा , अलौकिक  असा  कवडसा  दिसू  लागला . गळून  पडलेली  त्याची  गात्रे , सारे  अवयव  पाहता -पाहता  एका  अज्ञात  अश्या  बळाने  भरून  गेले . हताशा,निराशा   दूर  पळून  गेली  होती . आईच्या  त्या  आशीर्वादाने  त्याला  लढण्याचे  बळ  प्राप्त  झाले  होते . त्याची  जीवनाची , जगण्याची  उमेद  वाढली  होती . आईच्या  त्या  आशीर्वादाने  त्याला  खडतर  वाटा  सुकर , सरळ ,सहज ,सोप्या  करून  दिल्या  होत्या . आता  पुन्हा  एकदा  तो  नव्याने  संकटास, कठीण  परिस्थितीस  तोंड  देण्यास , धीराने  लढण्यास  तयार  झाला  होता, सज्ज झाला होता.

===============
कठीण दिसणाऱ्या वाटाही
सहज पार होतात
आईचे आशीर्वाद
जेव्हा आपल्या सोबत असतात.
===============

--नव-चारोळीकार
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी विचार.कॉम)
                    -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.06.2022-बुधवार.