एक किनारा

Started by शिवाजी सांगळे, June 09, 2022, 11:31:58 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

एक किनारा

एक किनारा मनाच्या अंतरात
काहीसा निवांत थोडासा शांत

विरघळणाऱ्या या पाऊलखुणा
मुरतात निशब्दपणे आत आत

झाकोळून जातो पुन्हा एक सुर्य
नभ विसावले जणू समुद्र गर्भात

अथांग मी की खोल तो कळेना
दिसतो जरी वरवर दोघेही शांत

नसतो एकटा मी न् तोही कधी
साथ देण्या असतो कुणी अज्ञात

साथसंगत वाऱ्याची भोवताली
तरीही उरतो एकाकी मी निवांत

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९