मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-20

Started by Atul Kaviraje, June 12, 2022, 02:11:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     मला आवडलेल्या चारोळ्या
                                        चारोळी क्रमांक-20
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं -चारोळीकार  कथित  चारोळीतून  या  प्रेमीला  आलेला  आपल्या  प्रेमिकेचा  प्रेमातला  अनुभव  सांगत  आहे . हा  प्रेमी  तिच्या  प्रेमात  पडला  आहे . ती  त्याच्या  जीवनात  आल्यापासून , त्याला  सारे  जग  हे  सुंदर  भासू  लागलंय . त्याच्या  नजरेतला  साऱ्या  जगाकडे  पाहण्याचा  दृष्टिकोन , ती  त्याच्या  जीवनात  आल्यापासून  बदलला  आहे . अशी  तिने  त्याच्यावर  जणू  जादूच  केली  आहे . पण  प्रेमात  खटके  उडणं , रुसवा , फुगवा  हा  होतंच  असतो . त्याशिवाय  प्रेमाला  गोडी  ही  कशी  येणार  बरे  ? हा  प्रेमी  पुढे  जाऊन  म्हणतो , की  सखे , तू  अशीच  माझ्यावर  रुसत  राहा , माझ्याशी  अबोला  धर , तुझ्या  चेहऱ्यावरचा  राग  दिसून  येऊ  दे . कारण  या  रागातच  मला  तुझा   अनुराग  स्पष्टपणे  दिसत  आहे . आणि  जेव्हा  जेव्हा  तू  माझ्यावर  रागावतेस , तेव्हा  तेव्हा  तू  मला  अधिकच  गोड , सुंदर  भासतेस . तुझा  रुसवा  , राग  तुझ्या  सौंदर्यात  अधिकच  भर  घालतो .

     चारोळीकाराचा  हा  प्रेमी , आपल्या  प्रेयसीकडून  काहीही  अपेक्षा  करीत  नाही . फक्त  तिचं   असणं , तिचं  सोबत  राहणं , तिचं  हसणं  त्याला  बळ  देऊन  जातं . असो , पुढे  जाऊन  तो  असं  म्हणतोय  की , प्रिये , तू  सारखी  माझ्यावर  रागावत  राहा , माझ्यावर  रुसत  राहा . मला  आता  ते  अधिकच  आवडू  लागलंय . गोड  वाटू  लागलंय . माझ्याप्रमाणे  माझ्या  मनासही  आता  तुझ्या  रुसव्या -फुगव्याचा  अनुभव  येऊ  लागलाय . आता  तर  असंही  घडू  लागलंय , की  ज्या  दिवशी  तू  माझ्यावर  रागावत  नाहीस , तेव्हा  ते  उदास  होऊ  लागतं . काहीतरी  कुठेतरी  त्याला  चुकल्यासारखं  वाटू  लागत . आणि  तुझ्या या  रुसव्या -फुगव्याचं  ते  अधिकच  उत्कटतेने  प्रतीक्षा  करू  लागत . ते  इतकं  भाव -विभोर  होत , इतकं  उत्कट  होत , की  सतत  तुझ्याकडे  ओढलं  जातं . त्याची  ही  तुझ्याकडची  ओढ  सांगून  समजणारी  नाही , तर  ते  प्रत्यक्ष  अनुभवास  यावयास  हवं . या  तुझ्या  रागानेच  तर  माझ्या  मनाने  मला  तुझ्या  आणिक  जवळ  आणलं  आहे , मला  तुझं  केलं  आहे . मला  सतत  तुझ्याकडे  ओढून  नेलं  आहे . अशीच  तू  माझ्यावर  रागावत  राहा , म्हणजे  ही  माझ्या  मनाची   ओढ  अधिकच  दृढ  होत  जाईल .

============
तुझ्या चेहऱ्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे,
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे...
============

--नव-चारोळीकार
-----------------

                        (साभार आणि सौजन्य-मराठी नेतृत्व .कॉम)
                       --------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.06.2022-रविवार.