मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-23

Started by Atul Kaviraje, June 18, 2022, 12:55:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      मला आवडलेल्या चारोळ्या
                                         चारोळी क्रमांक-23
                                     ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं -चारोळीकारास  या  जीवनाच्या  प्रवासाचा , चांगलाच  अनुभव  आलेला  दिसतोय , असे  या  चारोळीतून  प्रकट  होत  आहे . तो  म्हणतोय , जन्माला  आल्यापासून  हा  प्रवास  जो  सुरु  होतो , तो  अगदी  अंतापर्यंत , म्हणजे  मरण  येईपर्यंत . त्यात  येणारे , चार  टप्पे  म्हणजे  बाल्यावस्था , पौंगडावस्था , युवावस्था  आणि  शेवटची  म्हणजे  न  चुकता  येणारी  किंवा  न  चुकवता  येणारी  वृद्धावस्था. या  सर्वांत  येणारे  भोग ,प्राक्तन , सुख -दुःखे , सर्व  नियतीने  आधीच  ठरवून  दिलेले  असते . ते  तुम्हाला  कधीच  चुकवता  येत  नाही , टाळता  येत  नाहीत , ते  अटळ  असतात . जीवन  जगताना  सारी  नाती -गोती , आपली  माणसे , इतरेजन  काही  विशिष्ट  टप्प्यापर्यंतच  आपली  सोबत  करतात , आपली  पाठ -राखण  करतात . पण  तो  टप्पा  पूर्ण  होताच , पुढचा  मार्ग  आपल्याला  एकट्यानेच  करायचा  असतो . तेव्हा  आपल्या  साथीस , सोबतीस  कुणीही  नसतो . हा  प्रवास  अगदी  एकाकी  असतो .तो  स्वतःच  करायचा  असतो . एकट्यानेच  करायचा  असतो.

     पुढे  जाऊन  हा  चारोळीकार  असंही  म्हणतो , की  हा  प्रवास  करता  करता  कशाचीही , कुणाचीही , कधीही  अपेक्षा  न  करता, न धरता , तो  जीवनाचा  पुढील , आणि  अंतिम  टप्पा  अगदी  एकट्यानेच  पार , पूर्ण  करायचा  असतो . आपले  ध्येय  गाठण्यासाठी  कुणाचीही  मदत  न  घेता , कुणाचीही  संगत , सोबत  न  घेता  मार्ग -क्रमण  करायचे  असते . पथ -गमनी  व्हायचे  असते . कुणीही  मदतीस  येवो  ना  येवो , कुणाचीही  साथ  मिळो  वा  न  मिळो , कुणीतरी  हवयं , कुणीतरी  पाहिजे , याचा  हट्टही  न  धरता , हे  जीवन  जगायचे  असते . म्हणतात  ना , नाती -गोती  ही  फक्त  नावापुरतीच  असतात , हे  जिणे , जीवन  शेवटी  आपणा  एकट्यासच  जगायचे  असते . म्हणजे  थोडक्यात  कुणीही  कुणाचे  नसते . माणूस  शेवटी  एकटाच  असतो . ही  खूण -गाठ  मनाशी  बांधूनच  नियतीस  सामोरे  जायचे  असते , एकल -प्रवासाची  सुरुवात , श्रीगणेशा  करायचा  असतो . कुणीही  सोबत  नसलं  तरी  तो  परमेश्वर  आपल्या  सदैव  पाठीशी  असतो . आपली  सोबत  करीत  असतो .

==============
जीवनाचा प्रवास
स्वतःच करायचा असतो
कुणीतरी सदैव सोबत असावं
असा हट्टसुद्धा धरायचा नसतो.
==============

--नव-चारोळीकार
-----------------

                         (साभार आणि सौजन्य-मराठी विचार.कॉम)
                        --------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.06.2022-शनिवार.