मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-24

Started by Atul Kaviraje, June 19, 2022, 12:45:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    मला आवडलेल्या चारोळ्या
                                       चारोळी क्रमांक-24
                                  -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --या  चारोळीकाराने  आयुष्यात  खूप  काही  भोगलंय ,त्याला  या  स्वार्थी , मतलबी  जगाचा  चांगलाच  (वाईट ), अनुभव  आल्याचा  या  प्रस्तुत  चारोळीतून  बोधीत  होत  आहे .त्याच्या  मनाची  तळमळ , तगमग , त्याच्या  मनाला  झालेले  दुःख , मनाला  झालेल्या  वेदना , यातना  तो  पोट -तिडीकीने  आपणास  सांगत  आहे . त्यातच  या  आपमतलबी  जगातून  एक  सुंदरसे  प्रेम  त्याच्या  वाट्यास  नकळत  आलंय . ते  त्याने  आतापर्यंत  जपून  ठेवलंय . कारण  त्याच्या  जगण्याचा  तोच  तर  एक  सहारा  आहे , आसरा  आहे . त्याचे  हे  रखरखते  वाळवंटी  जिणे  तिने  बागेतल्या  फुलासमान  फुलवले . त्याची  त्याला  जाण  आहे . ओळख  आहे .

     पण  त्याला  राहून  राहून  शंका  येत  आहे ,त्याचे  मन  हे  अनेक  अज्ञात  प्रश्नांनी  आशंकित  झाले  आहे . म्हणूनच  की  काय  त्याला  त्याचे  हे  प्रेमही  निव्वळ  एक  मृगजळ  भासत  आहे . त्याचा  हळू -हळू  या  प्रेमावरचा , त्याच्या  प्रेयसीवरचा  विश्वास  उडत  चालला  आहे .आणि  त्याचे  मुख्य  कारण  म्हणजे  त्याच्या  वाट्यास  आलेले  भोग , समाजाची  प्रतारणा , लोकांनी  त्याची  केलेली  फसवणूक , त्याच्याप्रती  केलेली  घृणा , केलेला  अपमान . आणि  अत्यंत  दुःखित  होऊन , उद्वेगाने  तो  आपल्या  प्रेयसीस  प्रश्न  विचारीत  आहे , कि  हे  प्रिये , आतापर्यंत  समाजाने  माझा  गैरफायदा  घेऊन  माझ्याकडून  जे  काही  ओरबाडून  घेतले , ते  सारे  जप्त  करून  शेवटी  मला  नाही  नाही  ते  बोलून  झिडकारले  देखील , कारण  माझा  हा  स्वभाव . पुढे  जाऊन  तो  तिला  असंही  म्हणतोय , की  प्रिये  माझा  आता  तुझ्यावरचाही  विश्वास  कमी  झाला  आहे , या  जगाप्रमाणे , समाजाप्रमाणे तू देखील  तुझा  स्वार्थ  साधणार  बहुतेक .

     तो  आपल्या  प्रेयसीस  राहून  राहून  विचारतोय , या  समाजाने  मला  इतकं  लुटलं , ओरबाडलं , झिडकारलं , तसं  तूही  करणार   आहेस  का  ? की  तुला  यातलं  काहीही  नको , हे  तुझे  सारे  नाटक  आहे  का  ? का  तू  असं  खोटं  वागतेस  ? तुझा  यात  काही  स्वार्थ  आहे  का  ? की  तुझे  प्रेमही  या  समाजाच्या  वर्तनासमान  बेगडी ,  नाटकी , खोटे  अन  स्वार्थी  आहे  ? अश्या  अनेक  प्रश्नांनी  त्याच्या  मनात  फेर  धरला  आहे , आणि  तो  तिला  हे  विचारून  भंडावून  सोडत  आहे . आणि  शेवटी  वैतागून  तो  तिला  म्हणतो , की  तुही  आता  माझ्याकडून  काहीतरी  घेऊन  जा , मला  एकट्याला  सोड , तुझे  प्रेम  आता  प्रेम  नाही  राहिले . माझे  सारे  काही  घेऊन  तू  पाठी  वळून  देखील  पाहू  नको . मी  यापुढे  एकटाच  जगेन , पुन्हा  परतून  माझ्या  जीवनात  तू  येऊ  नकोस . चारोळीकाराचा  समाजाप्रती  आक्रोश  या  चारोळीतून  बाहेर  पडत  आहे , नि  आपणासही  विचार करण्यास  भाग  पडत  आहे . 

===================
या जगाने खूप काही ओरबाडलं,
तुलाच कसं गं, काही नको ??
जिथे जाऊ तिथे मला झिडकारलं,
तुलाच कसं गं, काही नको ??
काहीतरी स्वार्थ असेलच की तुझा,
की खरंच तुला अजून, काही नको ??
नुसत्या प्रेमाची आता सवय राहिली नाही,
तूही काहीतरी घेऊन जा माझं,
नाहीतर तूही येऊ नको...
===================

--नव-चारोळीकार
-----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ स्टेटस.एंटरप्रुनरशीप.कॉम)
                 -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.06.2022-रविवार.