चारोळी पावसाची-क्रमांक-5-पाउस व द्वेष

Started by Atul Kaviraje, June 20, 2022, 01:05:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        चारोळी पावसाची
                                            क्रमांक-5
                                      ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      माझं असं म्हणणं आहे की, आता हा पाउस मला दूरचा, लांबचा वाटतच नाही, परका तर बिलकुल ही वाटत नाही, त्याने मला येऊन इतके काही दिले आहे, भर भरून दिले आहे, कि कोणी आप्तही, किंवा जवळचा मित्रही इतके करू शकेल. त्याने मला निस्वार्थ पणे दान दिले आहे, प्रेम दिले आहे, प्रेम जल दिले आहे, प्रेम अमृत  दिले आहे, प्रेम सिंचन केले आहे, प्रेमाचे जीवन दिले आहे, असे त्याने एक नाते जोडले आहे, कि जे न भूतो न भविष्यति असे आहे. साऱ्या जगाने हे आमचे नाते पहिले आहे. ते हे पाहून विस्मय चकित झाले आहे. हि कोण बावरी राधा कि प्रेमार्पण  करणारी  मीरा ज्या दोघींनी त्या कान्हाला सम समान प्रेम दिले आहे, तद्वत हे जग आम्हा दोघांकडे पहात आहे, हे नाते जवळचे आहे, अतूट आहे, युगा युगांचे आहे.

      पाउस व द्वेष
    -------------
पाउस आला, जोडीत नाते
करीत जल-कुंभ प्रेमाचे रिते
द्वेष - आकस  सारीत दूर,
मनास  हर्षाचे देत भरते.

भेट झाली, नाते बांधले
आम्हा दोघांना त्याने जवळ केले
कसला  दुरावा, काय विरह ?
तिचे माझे मन असे जुळले.
===============


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.06.2022-सोमवार.