गोष्ट फुलांची

Started by शिवाजी सांगळे, June 20, 2022, 06:40:13 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गोष्ट फुलांची

अस्तित्वाने तुझ्या आठवते मला गोष्ट फुलांची
दरवळत्या मोगऱ्याने पुन्हा चढते नशा फुलांची

फुल होता होता सावकाश मग कळी कळीचे   
जाते फुलून एकएक फांदी अचानक फुलांची

गर्भ रेशमी रात्री गुंफता ओलावा तुज मिठीचा
सजते आरास तारकांसम भोवताली फुलांची

माळती गजरे अन् चढविती हार कधी फुलांचे
नतमस्तक होता वाहतात ओंजळ ती फुलांची

सुखदुःखाची भले असो कहाणी कशी कुठेही
पुर्णत्वा जाण्यास पडतेच गरज खरी फुलांची

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९