चारोळी पावसाची-क्रमांक-6-निस्वार्थी पाउस

Started by Atul Kaviraje, June 22, 2022, 12:39:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          चारोळी पावसाची
                                              क्रमांक-6
                                         ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     तर मित्रानो, असा तो पाउस, त्याचे ते निस्वार्थ सर्वांसाठी देणे, मनात काहीही न ठेवता, कसलाही किंतु , कोणतेही वैर, कुठलाही  द्वेष, कोणताही आकस, त्याचेकडे मला दिसला नाही, आमच्या मनुष्याप्रमाणे त्याचे नाही, कि हे सगळे भाव भावनाचे खेळ खेळत बसणे, वैर, दुही, दुरा -भीमान,अढी, आकस , फुका-गर्व हे त्याच्याकडे अगदी नावालाही सापडणार नाही,अगदी मोकळ्या मनाने आपुलकीने तो आपले हे प्रेमाचे जल-कुंभ अगदी भर भरून भूवर रिते करीत असतो, त्यात तो हात कधीच आखडता घेत नाही, नव्हे ते त्याला ते कधी जमतच नाही म्हणा. तुझे माझे त्याला कधी करता येत नाही थोडे अधिक त्याचेकडे नाही, दुजा भाव तो पहात नाही, साऱ्यांना एकाच नजरेत जोखतो, पहातो, समान प्रेमाचे वाटप करतो, आणी काय हवे, आम्ही मनुष्यांनी त्याच्याकडून हि एक शिकवण नक्कीच घेतली पाहिजे, कि एक होणे, एक रहाणे, भेद भाव न करता लहान मोठ्यांचा सन्मान करणे.

       निस्वार्थी पाउस
     ----------------
एक शिकवण देऊन जातो
माझा पाउस असा निस्वार्थी असतो
असे मनापासून वर्षत रहाता
आमच्या मनात घर करून राहतो.
=================


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.06.2022-बुधवार.