मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-26

Started by Atul Kaviraje, June 23, 2022, 12:53:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    मला आवडलेल्या चारोळ्या
                                       चारोळी क्रमांक-26
                                  -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं  चारोळीकाराने  यापूर्वी  बऱ्याच  चारोळ्यातून  आपल्या  आईच्या  महानतेची  बरीच   वैशिष्ट्ये  सांगितली  आहेत . तो  म्हणतोय , आई  ही  आपल्याशी  तिच्या  उदरात  असल्यापासून  बोलत  असते . काही  सांगत  असते . आणि  आपणही  तिला  नकळत  हुंकार  देत  असतो .  नवमासी  पूर्ण  होताच  आईच्या  उदरातून  बाहेर , या  जगात  येऊन  मोकळा  श्वास  घेताच , आपले  एक  नवे , वेगळे  आयुष्य  सुरु  होते . आता  तर  आई  माझ्याशी  प्रत्यक्षात  बोलू  लागते . आईला  ओळखण्याची  काही  वेगळी  गरज  नसते . तिच्या  स्पर्शातूनच  ते  कळतं  असतं . आईच्या  आणि  माझ्या  भावना  ज्या  नाळेने  दृढ  बांधलेल्या  असतात , त्या  नाळ  गळून  पडून  गेल्यावरही , शेवटपर्यंत  त्याच  राहतात , त्यासाठी  काही  वेगळ्या  समीकरणांची  गरज  नसते .

     तर  अशी  ही  माझी  आई  माझ्या  मनातल्या  साऱ्या  भावना , वेदना , कळकळ , तगमग,तळमळ अगदी  न  सांगताही  अचूक  ओळखते . मला  काय  हवंय , माझी काय  गरज  आहे , मला  काय  आवडत , नावडत  हे  तिला  न  सांगताही  कळतं . केव्हातरी  मनातल्या  भावना  तिला  सांगताना  मला  जड  जातं , सांगू  की  नको  असं  होऊन  जातं . पण  आईला  माझा  हा  अस्वस्थपणा , माझी  काहिली , मनाची होणारी घालमेल  स्पष्टपणे  माझ्या  डोळ्यांत  जाणवते . त्यासाठी  शब्दांची  आवश्यकता  नसते . माझे  सुख  दुःख,  माझ्या  मनातल्या  साऱ्या  भावना  ती  तिच्या  डोळ्यांनी  अचूक  टिपते , माझे  बोलके  डोळे  तिला  बरंच  काही  सांगून  जातात .

     आपल्या  मुलांना  काय  हवंय , काय  नकोय , त्याला  काय  प्रिय  आहे , काय  आवडतं , नावडत  हे  ओळखण्याची  किमया  फक्त  आईच  साधू  शकते . दुसऱ्या  कोणासही  ही  दैवी  शक्ती  प्राप्त  नाहीय . तर  अशी  ही  आई , हे  वैशिष्ट्यपूर्ण   वरदान  फक्त  तिलाच  प्राप्त  असतं . आणि  म्हणून  आई  ही  आईच  असते .तिला  कुणाचीही  सर  नाही . तर  तुमच्या  मनातलं, आपल्या मुलांच्या मनातलं  सहज  ओळखणारी  आई  ही  सर्वांना  लाभो , मिळो .

============
डोळ्यात बघून
जे मनातलं ओळखते
ती फक्त आणि फक्त
आईच असते.
===========

--नव-चारोळीकार
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी विचार.कॉम)
                    -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.06.2022-गुरुवार.