चारोळी पावसाची-क्रमांक-7-मने जिंकणारा पाऊस

Started by Atul Kaviraje, June 24, 2022, 12:29:15 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         चारोळी पावसाची
                                             क्रमांक-7
                                       -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     मित्रानो तर असा हा माझा पाउस, आपला पाउस, आपल्या येण्याने सर्व सर्व विकारांना दूर ठेवून एक हर्षाचे आनंदाचे भरते देतो, सर्वाना एक पाहतो, सर्वाना एक करतो, काय अशी त्याच्याकडे जादू आहे, कि प्रत्येक मनुष्य प्राणी त्याला पाहून बेभान होतो, आपले अस्तित्त्व विसरतो, त्याला एक भुरळ पडते, मोहिनी येते, तो मंत्रमुग्ध होतो, भान विसरून फक्त पावसालाच पहात राहतो, पुन्हा पुन्हा पाहतो, मन भरेपर्यंत पाहतो, एका दुसऱ्या जगात हा पाउस त्याला नेतो, जेथे फक्त प्रेम असते, द्वेष आकस हे कोसो दूर असतात, एक निर्मळ मन असते, आपले पण असते, जिथे फक्त तो पाउस बरसत असतो, अथक, निरंतर, अविरत , अन सगळ्याची मने जिंकत .

    मने जिंकणारा पाऊस
   --------------------
तो आला, त्याने जिंकले
त्याने सर्वाना एक केले
प्रेमाचे भर भरून मुक्त हस्ते
त्याने दान सर्वाना दिले.
==============


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.06.2022-शुक्रवार.