चारोळी पावसाची-क्रमांक-8-सृष्टीचे नटणे

Started by Atul Kaviraje, June 26, 2022, 12:56:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       चारोळी पावसाची
                                           क्रमांक-8
                                      ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     तर मित्रानो, असा हा आपला श्रावणातला पाउस, पडतो, भिजवतो, सृष्टीला सौंदर्य देतो, देखणेपण देतो, असा तो गुणी पाउस, त्याच्या येण्यामुळे, सारी सृष्टी डोलू लागते, नाचू लागते, अनुकम्पित होते, तिची  एखाद्या नव वधू सम अवस्था होते, प्रियकराची आस घेऊन प्रेयसी चे जसे वर्तन होते, तसे या सृष्टीचे पावसाला पाहून  होते, मग ती त्याच्या येण्याने लज्जित होते, लज्जेचI तिचा मुखवटा वर वरचा नसतो तर तो अंतरातून येत असतो, आणी अशी वाट पहात असता, तो पाउस अवचित येतो, तिच्या भेटीस येतो, तिला भिजवतो, हिरवीगार करतो, तिचे अंग अंग हिरवे करतो, ओले करतो.

           सृष्टीचे नटणे
          ------------
हिरवे हिरवे गार गालिचे
रंग-कुसुमांचे वर रेखिले कशीदे
आभाळी  इंद्र-धनुचे अनिमिष कडे
इतके कसे माझे सौंदर्य वाढले ?
त्या सृष्टीस एकदा पडले होते कोडे.
=================


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.06.2022-रविवार.