चारोळी पावसाची-क्रमांक-9-सृष्टीची हिरवाई

Started by Atul Kaviraje, June 27, 2022, 12:23:54 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        चारोळी पावसाची
                                            क्रमांक-9
                                       ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     तर मित्रानो एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराच्या केवळ स्पर्शाने जशी लाल-गुलाबी होते, तिच्या गालावर लाली येते, तशीच हिरवाई, आपल्या श्रुष्टीच्या गाली ( येथे तिला मी हिरव्या रंगाने लज्जित केले आहे ) दाट हिरवेपण त्या पावसाच्या येण्याने चढले आहे, ती लाजून जणू हिरवी हिरवी गार झाली आहे, तीचे आधीचे हिरवे रूप अजूनच गडद हिरवे झाले आहे, आणी ती त्या आपल्या प्रियकराचे पावसाचे स्वागत  हिरवा शालू, हिरवा चुडा परिधान करून नख-शिखांत हिरवाईने नटून थटून  करीत आहे, सगळीकडे तिचे रूप विखुरले  गेले आहे. जिथे पहावे तिथे हे हिरवेपण नजरेस भरत आहे, ती झाडे ,ती पाने, ती हिरवळ तिचे रूप घेऊन खुशीत डोलत आहेत, त्या हिरवळीने तर एखाद्या हरित बिछान्याचे, शेजेचे रूप घेतले आहे व ती हिरवळ पावसास खुणावत आहे, कि तू दमला असशील ये जरा जवळ आणि आमच्या या शेजेवर थोडी विश्रांती घे, थोडा आराम कर, हि आमची मखमल आम्ही तुझ्यासाठीच पसरवली आहे, हे सर्व तुझेच देणे आहे,म्हणून तुझा आमच्यावर पूर्ण हक्क आहे.

         सृष्टीची हिरवाई
      -----------------
बिछायत सजवली तुझ्यासाठी
गालीचा अंथरला तुझ्यासाठी
मखमल अमुची कुरवाळून जा हळूच
हर्ष थोडा पखरून जा हळूच
==================


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.06.2022-सोमवार.