चारोळी पावसाची-क्रमांक-10-हरित तृण प्रार्थना

Started by Atul Kaviraje, June 29, 2022, 01:05:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        चारोळी पावसाची
                                           क्रमांक-10
                                      -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     तर हे पावसा, ये आणी आम्हाला डोलव, झुलव आणि तुही आमच्याबरोबर हर्षित हो, आनंदी  हो. तुझे अमृत थेंब आमचे प्राण दाते, जीवन दाते आहेत, आमचे अंकुर पहा तुला पहाण्यासाठी कसे जमिनीतून वर आले आहेत, केवळ तुझ्या दर्शनाखातर, केवळ तुझ्यासाठी त्यांनी हा अट्टाहास केला आहे, तू येण्याची वार्ता कळली कि आमचे अंग कसे मोहोरून जाते, उर कसा भरून येतो, वर्षभर जे जपले ते तुला आम्ही भर भरून देण्यासाठी आमचे दान करतो, हि हिरवळ म्हणते हे हरित तृण, हि गवताची पाती म्हणतात,  आमचे जीवन हे कदाचित क्षण भंगुर हि असावे, पण तुला पाहिल्यानंतर हे मरण असे अनेकदा यावे असे वाटते, हे मरणही मग कसे सुसह्य होते, आम्ही कदाचित यांनतर पायदळी हि तुडवले जाऊ, पण आम्हाला त्याची खंत नाही, आम्हाला फक्त तुला पाहायचे आहे.

     हरित तृण प्रार्थना
    ----------------
एक आस या हरित तृणांची
गहिवरल्या उरी ते वदती
कोंब अमुचे पुन्हा तरारतील
पुन्हा पुन्हा ते तुला पहातील.
=============


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2022-बुधवार.