छिन्न विछिन्न

Started by @गोविंदराज@, June 29, 2022, 05:37:48 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

सगळं कसं छिन्न विछिन्न झाल्या सारखं वाटतंय...
जिवंत असून हि मला आता मेल्यासारखं वाटतंय...

खरंच मी इतका नीच असेल का ?
खोटं वागणारा तुझ्याशी तो मीच असेल का ?

जरी मी तुझ्याशी नीट वागलो नाही...
हे खरंय मी कधीच खोटं बोललो नाही ...

डोळ्यापुढं आता अंधार दिसतो आहे ...
मीच माझ्या मनात स्वतःला पिसतो आहे..

भिकार असं माझं आता जगणं झालंय ..
बेकार असं माझं आता वागणं झालंय...

असा मी नव्हतो नेहमी म्हणत आलो...
तुला कुठं मी कधी जाणत आलो ...?

तुझ्यावर मी आरोप केले असं नाही ...
खोटं काही मांडत आलो असं नाही ...

जे मी केलं ते चुकीचं नाहीच असं नाही ....
करते वेळी मात्र मला त्याचा भास नाही ...

तुझं मन दुखावणं मलाही आवडत नाही ...
पण बोलते वेळी का मी चांगले शब्द निवडत नाही ?

गोविंदराज
२९.०६.२०२२