गुन्हा

Started by @गोविंदराज@, June 29, 2022, 08:20:01 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

असा कसा मी बधीर झालो ...
कशासाठी एवढा अधीर झालो ...?

केलंच काही तर बोलून दाखवलं ...
माझं घोडं मीच का नाचवलं ...?

तुझा शब्द ना शब्द अगदी सत्य आहे ...
मी काहीतरी सांगण्यात आता काय तथ्य आहे ...?

खोटेपणा नव्हता कशातच एवढं खरं आहे ...
कळतं नाही आता काय बुर आणि काय बरं आहे ..?

क्षमा नसावी माझ्या या अशा वागण्याला ...
काही तरी अर्थ आहे का आता या जगण्याला ..?

उचलली जीभ आणि लावली टाळेला ...
पाणी नसेल तर किंमत काय त्या गाळेला ..?

निरर्थक शहाणपणाचा मी कळस ठरलो ...
स्फूर्ती अंगात असून हि का मी आळस ठरलो ..?

उभा झडलो तरी माझ्या मनात मी पुन्हा नाय ...
तुला ओळखता ना येणं यापेक्षा मोठा गुन्हा काय ...?

गोविंदराज
२९.०६.२०२२