चारोळी पावसाची-क्रमांक-11-पाउस व धुके

Started by Atul Kaviraje, July 01, 2022, 12:50:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        चारोळी पावसाची
                                           क्रमांक-11
                                      ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     मित्रानो, रोजच्या प्रमाणेच आजही एक सुंदर पहाट मी पाहतेIय, सूर्य-नारायणाला भू-वर अवतरायला अजून खूप अवकाश आहे, त्या-आधी निसर्गाने धरेला बहाल केलेली अनेक आश्चर्ये मी गेले कित्येक वर्षे पाहतेIय.  नित्याप्रमाणेच, त्या दंव-बिंदू सह तो दाट धुक्याचा पडदा कुठून कोण जाणे  पण अवतीर्ण झालI आहे, मागे मी दंव बिंदूवर एक चारोळी रचली होती, आज धुक्यावर हि चारोळी आहे, तर मित्रानो, पहाता पहाता माझ्या नजरेच्या टप्प्यातील ते क्षितीज त्या धुक्याने वेढले गेले, एक जाडसर असा सफेद रंगाचा, पांढर्या वर्णाचा असा दाट पडदा त्या क्षितिजाला झाकोळून गेला. इतका कि ते क्षितिजही त्यात स्वताला हरवून बसले, स्वतःचे अस्तित्त्व गमावून राहिले, मग त्या क्षितिजाच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टी या धुक्याने वेढल्या  गेल्या, जवळ जवळ दृष्टी च्या पार जाऊन पोहोचल्या, त्यांचे नामो  निशाण हि मिटून गेले . असे ते धुके दिमाखाने त्या क्षितिजावर आपले शुभ्र राज्य करू लागले होते.

         पाउस व धुके
       --------------
पहाट झाली, पसरले धुके
दाट -पांढरे, झाले क्षितिजही फिके

क्षितिजही गेले झाकोळून
या धुंद फुंद धुक्यापाठी
स्वतःस बसले हरवून का ?
कि कपाळावर पाडून आठी ?
================


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.07.2022-शुक्रवार.