दुरावा

Started by ssc, July 02, 2022, 12:02:08 PM

Previous topic - Next topic

ssc

आहेस आता खूप दूर
पण तुझा भास तर आहे ना..
थोडासाच असला तरी
जगण्याची आस तर आहे ना..!!

दूर असला तरी तुझ्या प्रेमाची एक आठवण पुरेशी होते..
घालवलेल्या सगळ्या क्षणाची साठवण जगण्याची शिदोरी ठरते..!

परीक्षा आहे हि आता आपल्या प्रेमाची..
आठवणीत तुझ्या आपले नाते जपण्याची..!

वाट पाहते त्या क्षणाची तुला येऊन भेटण्याची..
चांदण्यांनी फुललेल्या रात्रीत हातात हात घालून फिरण्याची..!

सोबत नसला तरी तुजी साथ तर आहे ना..
थोडासाच असला तरी जगण्याची आस तर आहे ना..!!

dev ingole