चारोळी पावसाची-क्रमांक-12-क्षितिजावरले धुके

Started by Atul Kaviraje, July 03, 2022, 12:51:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      चारोळी पावसाची
                                         क्रमांक-12
                                    ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     असे ते स्वतंत्र क्षितीज , ज्यावर कुणीही आजवर आक्रमण करू शकले नव्हते, जे आजवर अपराजित होते, जे स्वताच एक सम्राट होते, त्याचे आज गर्व-हरण झाले होते, ज्या क्षीतीजाने आजवर कित्येक सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, पहिले होते, ते केवळ एका क्षुल्लकश्या धुक्याने जवळ जवळ भुई सपाट झाल्यासारखे वाटत होते, ते आज पराजित होते, एक वेळ अजेय असणारे ते आज हार मानीत होते, आणी मग त्या क्षिताजाला हि खात्री पटली, कि केवळ एक हाच निसर्ग महान आहे, तो मनात आणले तर कुणाचेही गर्व-हरण एका क्षणात करू शकतो, आज हे धुके माझ्यापेक्षाही सरस ठरले, आपल्या दाट पट्ट्याने त्याने मला अक्षरशः झाकून टाकले, माझे अस्तित्व मिटवून टाकले.

     क्षितिजावरले धुके
    ----------------
क्षितिजही गेले झाकोळून
या धुंद फुंद धुक्यापाठी
परी चाहूल लागता पर्जन्याची,
विरले पहाता, हलके-हलके.

हार मानली मी तुजपुढे
मलाही तू, तुज ताकदीने वेढले
तुझ्या घन अस्तित्त्वाने माझे
अस्तित्त्व हे असे लोपले
===============


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2022-रविवार.