चारोळी पावसाची-क्रमांक-14

Started by Atul Kaviraje, July 07, 2022, 12:49:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      चारोळी पावसाची
                                         क्रमांक-14
                                    ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     वर्षभर हा रस्ता, हि वाट आपल्या अंगा  खांद्यावर बऱ्याच गोष्टीना सहन करीत असते, चालवीत असते, खेळवीत असते, मग ती शहरातली असो, वनातली, जंगलातली , रानातली असो, मग हा रस्ता असो, वाट असो, पथ असो, पाय-वाट असो, खेड्यातली असो, सरळ, वळणा-वळणाची, वाकडी असो,  काट्यांची असो. ती काही काळाने धुळीने माखणारच, मलीन होणारच, बरेच दिवस म्हणजे जवळ जवळ गेले कित्येक  महिने सर्वांची  पाय धूळ, नैसर्गिक धूळ हि अशी त्या वाटेवर जमून राहिली आहे, त्यामुळे ती अस्वच्छ , मलीन अशी झाली आहे, आणी मग इतके महिने  ती वाट अशीच राहून आज कुणाचीतरी वाट पाहत आहे.

    पाउस व मृत्तिका
   ----------------
अमृत थेंब अंगावर घेउनी
वाट हि पावन झाली
मृद-गंधाची सुरभी पसरून,
माती हि पहा धन्य झाली.
=============


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.07.2022-गुरुवार.