मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-34

Started by Atul Kaviraje, July 10, 2022, 12:58:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  मला आवडलेल्या चारोळ्या
                                     चारोळी क्रमांक-34
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --या  प्रस्तुत  चारोळीतून  अति -रंजनाचा  भाग दिसत  आहे , असं  मला  बिलकुल  वाटत  नाही . कारण  या  चारोळीतील  प्रेमीला , असा  काही  अनुभव  आलाय , की  तो  आपल्या  सुंदर  प्रियेचे  वर्णन , बखान  करण्यास  कचरत  नाही , हात  राखत  नाहीय , आखडता  घेत  नाहीय  . त्याची   ही   प्रेयसी  इतकी  सुंदर  आहे , इतकी कमनीय, रेखीव आहे  की  एखादे  शिल्पच  जणू . असं  वाटतं  कि  त्या  परमेश्वराने  फुरसत  मध्येच  तिला  घडवलं  असावं , तिची  निर्मिती  केली  असावी . इतकं  तीच  लावण्य  आहे , इतकी  ती  देखणी  आहे .

     पुढे  हा  चारोळीकार  म्हणतोय , की  त्याचा  नायक , प्रेमी  आपल्या  प्रियेच्या  प्रिया -राधनात  इतका  मशगुल  आहे , इतका  गुंतला  आहे , की  त्याला  तिच्याशिवाय  दुजे  काहीही  दिसत  नाहीय . कितीही  वेळा  पहिले  , अगदी  शेकडो , हजारो  वेळा  पहिले , तरी  त्याचे  मन  भरत  नाहीय . इतकं  तीच  रूप  मोहक , सुंदर , मन -वेधक  असं  आहे . तो  म्हणतोय , की  प्रिये  तुझ्यात  असं  काही  आहे , की  तुला  हजार  वेळा  पाहत  राहावं , अन  नुसतं  पाहतच  रहावं . पुढे  तर  या  चारोळीने  कळसच   गाठला    आहे . प्रत्यक्ष  डोळ्यांनी  पाहून  त्याचे  मन  भरले  नाहीय , तर   आता  त्याला  ती  डोळे  बंद  करूनही  समोर  असल्याचे  भासत  आहे . तिची  सुंदर  मूर्ती  त्याच्या  डोळ्यांपुढून  ते  मिटले  असताही  हटायला  मागत  नाही . अश्या  या  डोळ्यांच्या  उघड -मीट  अंदाजात  किती  वेळ  गेला  तेही  या  प्रेमीला  कळत  नाहीय . आपल्या  प्रेयसीला  डोळ्यांनी  पाहावे , मिटल्या  डोळ्यांनी  पाहावे , पापण्यांच्या  आडून  पाहावे , पुन्हा  टक्क  उघड्या  डोळ्यांनी  पाहावे , असा  त्याचा सारा  खेळ  चालू  आहे .

=============
हजार वेळा तुला पहावे
असेच काही तुझ्यात आहे
मिटुन ङोळे पुन्हा बघावे
असेच काही तुझ्यात आहे.
=============

--नव-चारोळीकार
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.07.2022-रविवार.