चारोळी पावसाची-क्रमांक-16

Started by Atul Kaviraje, July 11, 2022, 12:18:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      चारोळी पावसाची
                                         क्रमांक-16
                                    ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     अश्या त्या पावसाने येऊन न केवळ हि मलीन वाट साफ केली आहे तर त्या मातीतही तो मिसळला आहे, त्या मातीत त्याने आपले हे अमृत-जल खोलवर रुजवले आहे, आणी एक अनोखा, आजवर न पाहिलेला आजवर न अनुभवास आलेला असा एक दरवळ, एक परिमल, एक दैवी सुगंध, श्वासात भिनतोय, खोलवर आत आत जातोय, शरीरभर पसरतोय, त्यIची मादक नशा, मोहक धुंदी पेशी-पेशींत सामावतेय, रंध्रा-रंध्रात खोलवर रुजतेय, एक ईश्वरी अनुभव येतोय. असा हा पहिला पाउस आणी हि त्याची  अवर्णनीय महती, ती मातीही आज धन्य झाली या पावसाला पाहून, आणी आपल्याकडे होते नव्हते ते तिने सर्व काही त्याला दिले, त्याचे स्वागत तिने या आपल्या प्रथम सुगंधाने , परीमलाने केले  जो दूर दूरवर पसरला होता.


    मृत्तिका सुरभ-स्पर्श
   ------------------
मातीलाही आज गंध आला
पावसाने तिला एक स्पर्श दिला
त्याच्या प्रथम येण्याच्या आनंदात
तिने तो दूरवर पसरवला
===============


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.07.2022-सोमवार.