मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-35

Started by Atul Kaviraje, July 12, 2022, 12:51:38 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  मला आवडलेल्या चारोळ्या
                                      चारोळी क्रमांक-35
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं  चारोळीकाराची  देवावर  श्रद्धा  आहे , त्या  अज्ञात  शक्तीवर  विश्वास  आहे . तो  त्या  परमेश्वराला  मानतो . सश्रद्ध  देवळात  जाऊन  त्याच्या  चरणी  नतमस्तक  होतो , त्याची  पूजा   करतो . मूर्तीला  प्रदक्षिणा  घालतो .पण  त्याचे  याबतीत  दुमत  आहे . तो  म्हणतो , आई -वडीलही  त्या  देवासमानच    आहेत , ज्यांनी  आपल्याला  जन्म  दिला , आपले  पालन -पोषण  केले , मोठे  केले , दुःख  उपसले , जगण्यास  काबील  केले , काहीतरी  बनण्यास , कुणीतरी  होण्यास  ते  कारण  झाले . आणि  म्हणूनच  तो  आपल्या  आई -वडिलांमध्ये  देवाला  पाहतो . त्या  दोघांत  त्याला  देव  दिसतो .

     पुढे  तो  असंही  म्हणतो , देवाचे  दर्शन  होण्यास , देव  प्राप्त  होण्यास , तो  पावण्यास , त्याचा  वरद -हस्त  मस्तकी  लाभण्यास , जो  तो  प्रयत्नशील  असतो . देवाचे  प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष  आशिष , आशीर्वाद  मिळण्यासाठी  कुणी  उपवास  धरतो , कुणी  निर्जळी  करतो , तर  कुणी  एक  वेळ  उपाशी  राहून  करतो , कुणी  रोजा  धरतो , कुणी  गुरुद्वाराची  पायरी  चढतो , कुणी  मशिदीत  नमाज  पढतो , तर  कुणी  नाना  प्रकारे  देवाची  आळवणी  करतो , की  ज्याद्वारे  देव  त्यांना  प्राप्त  व्हावा , मिळावा , त्याचे  दर्शन  व्हावे , तो  त्यांना  प्रसन्न  व्हावा .

     नवं  चारोळीकाराचं  आग्रहाचं  म्हणणं , मानणं  आहे , की  तुम्ही  त्या  देवाबरोबर  आपल्या  आई -वडिलांनाही  तितकचं  पूजा , त्यांचा  तितकाच  आदर  ठेवा , त्यांचा  तितकाच  मान  ठेवा , ज्यांनी  तुम्हाला  जन्म  दिला , ज्यांनी  तुम्हाला  या  जगात  आणलं , ज्यांनी  तुम्हाला  या  जगाची , पर्यायाने  स्वतःची  ओळख  करून  दिली . जग  तुम्हाला  त्यांच्यामुळेच  तर  ओळखू  लागलंय . म्हणून  मी  म्हणतो , की  तुम्ही  रोजा  ठेवा , पूजा  करा , उपवास  धरा ,भक्ती   करा , भजन  करा , काहीही  करून  देवाला  प्रसन्न  करण्याचा  प्रयत्न  करा . पण  हेही  लक्षात  ठेवा , की  आई -वडील  म्हणजे  प्रत्यक्ष  देवच  आहेत , देवासमान  आहेत  . ते  त्या  परमेश्वराचाच  एक  अंश  आहेत . म्हणून  मी  म्हणतो , जर  का  तुम्ही  आई -वडिलांना  मानलत , त्यांच्यापुढे  सश्रद्ध  झुकलात , त्यांचे  चरण -स्पर्श  केलेत , तर  त्यातच  देव  आहे . आणि  हा  ईश्वर  तुम्हाला  पाहात  आहे , तो  तुमच्यावर  हे  पाहून  खचितच  प्रसन्न  होईल ,तुम्हाला  पावेल , कारण  त्याला  माहित  आहे , आई -वडिलांची  भक्ती  म्हणजे  माझी  भक्ती , आई -वडिलांना  केलेलं  नमन ,नमस्कार  हा  मला  पोचतो .

कुणी उपवास धरला
कुणी रोजा ठेवला
ज्यांनी आईवडीलांना पूजलं
देव त्यांनाच पावला.
=============

--नव-चारोळीकार
----------------


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी विचार.कॉम)
                    -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.07.2022-मंगळवार.