चारोळी पावसाची-क्रमांक-17-पाउस व शीळ

Started by Atul Kaviraje, July 13, 2022, 12:38:50 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        चारोळी पावसाची
                                           क्रमांक-17
                                       ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     अचानक वारा वाहू लागला होता, अचानक त्याने थोडे उग्र स्वरूप  घेतले होते, थोडीशी शीतलता, एक थंडावा मला  त्यात  जाणवू लागला होता, असा थंड पवन तेव्हाच वाहतो, जेव्हा जेव्हा पावसाचे आगमन होते, मला आता ते सवयीने माहित होते, नव्हे मी माझ्या या मित्राला ओळखून होतेI, कि तो येताना एकटाच येत नाही, तर आपल्या अनेक मित्रांना सवे घेऊन येतो, एक चांगली शिकवण मनुष्याने यातून नक्कीच घेतली पाहिजे, कि एकटे रहाण्यात काही अर्थ नाही, एकत्र रहाण्यातच जीवनाचे सार आहे. तर मित्रानो हा शीतल, सोसाट पवन त्या पावसाची नांदी घेऊन आला आहे, तो म्हणतोय कि आता तुम्ही सर्वांनी त्याच्या स्वागता तयार राहा, ज्याची तुम्ही रोज आतुरतेने वाट पहात आहात.

      पाउस व शीळ
     --------------
पर्ण-राई तून शीळ घुमली
पवना संगे  मधुर झाली
टप - टप थेंबांची होऊन सुरुवात,
ती पहा वर्षा राणी आली.

निरोप घेऊन आलोय मी
सांगावा त्याचा पोहोचवतोय मी
एक अनुभव, एक वेगळी अनुभूती
घेण्यास तयार रहा तुम्ही
================


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.07.2022-बुधवार.