१४-जुलै-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, July 14, 2022, 12:31:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०७.२०२२-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१४-जुलै-दिनविशेष"
                                     -------------------

-: दिनविशेष :-
१४ जुलै
=========================================

अ) महत्त्वाच्या घटना:
    ----------------
२०१३
डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.
१९७६
कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
१९६९
अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
१९६०
चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. पुढील ४५ वर्षे त्यांनी चिंपांझींमधील कौटुंबिक व सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी संशोधन केले.
१८६७
आल्फ्रेड नोबेल यांनी 'डायनामाईट' या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
१७९०
फ्रेन्च राज्यक्रांती – पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. या घटनेने फ्रेन्च राज्यक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

=========================================

ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
   -----------------------------
१९६७
हशन तिलकरत्‍ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व राजकारणी
१९४७
नवीन रामगुलाम – मॉरिशसचे ३ रे व ६ वे पंतप्रधान
१९२०
शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
(मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)
१९१७
रोशनलाल नागरथ ऊर्फ 'रोशन' – संगीतकार
(मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)
१९१७
नूर मोहम्मद तराकी
नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९)
१८८४
यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधी
(मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)
१८५६
गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व 'केसरी'चे पहिले संपादक, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, 'सुधारक' या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक
(मृत्यू: १७ जून १८९५)

=========================================

क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    --------------------------
२००८
यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश
(जन्म: १२ जुलै १९२०)
२००३
प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ 'रज्जू भैय्या' – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक
(जन्म: २९ जानेवारी १९२२)
२००३
लीला चिटणीस
लीला (नगरकर) चिटणीस
(जन्म: ९ सप्टेंबर १९०९ - धारवाड, कर्नाटक)
१९९३
श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार
(जन्म: ? ? ????)
१९७५
मदनमोहन – संगीतकार
(जन्म: २५ जून १९२४)
१९६३
स्वामी शिवानंद सरस्वती
१९८६ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू
(जन्म: ८ सप्टेंबर १८८७)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.07.2022-गुरुवार.