मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-38

Started by Atul Kaviraje, July 19, 2022, 12:51:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  मला आवडलेल्या चारोळ्या
                                     चारोळी क्रमांक-38
                                -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --खरोखरच , लज्जा  हाच  खरा  स्त्रीचा  दागिना  आहे . आणि  निसर्गरीत्या  तो  तिच्या  चेहऱ्यावर  आपसूकच येत  असतो . त्यात  काहीही  कृत्रिमता  दिसून  येत  नाही . स्त्रीसुलभ  अश्या या  लज्जेच्या  दागिन्यांची  सर  खऱ्या  दागिन्यांना  येणे  कदापिही  शक्य  नाही . त्यातच  तिचे  सौंदर्य  अधिकच  खुलून  दिसते , नव्हे  उलट  तिचे  सौंदर्य  हे  पूर्वीपेक्षा  अधिकच  द्विगुणित  होते , तिचे  लावण्य  अधिकच  खुलून  येते . आणि  हा  दागिना  ती  जन्मभर  जपत  असते .

     प्रस्तुत  चारोळीतून , या  चारोळीतील  प्रेमिका , नायिका  स्वतःचे  मनोगत  व्यक्त  करीत  आहे . ती  आपल्या  प्रेमींच्या  प्रेमात  आकंठ  बुडाली  आहे . तो  तिला  आता  पूर्वीपेक्षा  अधिकच  आवडू  लागला  आहे .त्याचे  प्रेम  खरे  आहे ,प्रामाणिक  आहे , निरामय  आहे , निरागस  आहे . त्याचे  बोलणे  इतके  लाघवी , प्रेमळ , गोड , मधाळ  आहे  की  त्याच्याकडे  टक  लावून पाहत राहावे , कान देऊन  ऐकत  राहावे , त्यात  बुडून  जावे , हरवून  जावे . मग  कोणाचीही , कशाचीही  अपेक्षा  न  ठेवता  त्याचे  बोलणे  फक्त  ऐकत  राहावे  असे  तिला  वाटते .

     पुढे  ही  प्रेमिका  असं  म्हणते  की , त्याच्या  बोलण्यात  एक  जादू  आहे , नजाकत  आहे . त्याचे  बोलणे  इतके  मोहक  आहे , की  त्यात  गुंतून  जावे , गुंफून  राहावे ,जगाचे  भान  विसरावे , भ्रमित  व्हावे . एक  नशा  त्याच्या  बोलण्यात  आहे , हे  ही  प्रेमिका  प्रांजळपणे  कबूल  करते . ती  पुढे  म्हणते , आणि  असं  करता  करता  जेव्हा  तो  माझी , माझ्या  वागण्या -बोलण्याची , सौंदर्याची  तारीफ , बखान  करतो , तेव्हा  मला  स्वर्ग -धरती  एक  झाल्यासारखेच  भासते . आणि  मग  स्त्री  सुलभ  लज्जा  माझ्या   गुलाबी  गालांवर  अवतीर्ण  होते, लज्जेचे गुलाबी गुलाब माझ्या चेहऱ्यावर फुलून ते  अधिकच  आरक्त  होतात . आणि  पाहता  पाहता  हे  लाल  गुलाबी  रंग  माझ्या  गालावरच्या  खळीत  आकंठ  बुडून , माझ्या  सौंदर्यात  अधिकच  भर  घालतात .

तो बोलायला लागला की,
मी हरवून जाते..
त्याच्या कडून माझी तारीफ ऐकताच,
लाजेने गुलाबी होते..!!
==================

--नव-चारोळीकार
----------------

                        (साभार आणि सौजन्य-मराठी नेतृत्व.कॉम)
                       -------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.07.2022-मंगळवार.