चारोळी पावसाची-क्रमांक-21-मौक्तिक दंव-बिंदू

Started by Atul Kaviraje, July 20, 2022, 12:54:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      चारोळी पावसाची
                                         क्रमांक-21
                                     -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     तर असे हे दव पाना- फुलांवर दिमाखात डोलत आहेत, नव्हे हि पाने फुले रोज पहाटेच त्यांची आतुरतेने वाट पहाताना दिसतात. आणी ते आले, कि भक्ती भावाने हात जोडून त्याना  ते आपल्यात सामावून घेतात. मग ते दवहि त्यांच्या मिठीत आपसूक निवांत डोलत राहतात, हि पाने फुले त्यांची इतकी काळजी घेतात, कि चुकूनहि ते निसटू नयेत, एकसंध राहावेत, अखंड राहावेत. आणी मोदे मंद वार्यासंगे ते त्यांना झुलवतात, डोलवतात. पण खाली पडू न देतात, हे अखंड दव हे मोतिया स्वरूप भासतात, असे वाटते. या झाडांनी , फुलांच्या बागेने आपल्या पर्ण-कुसुमा मार्फत एक स्फटिक मौक्तिक माला परिधान केली आहे.

    मौक्तिक दंव-बिंदू
   -----------------
पानांनी आपले हस्त जोडले
पाकळ्यांनी अंग मिटून घेतले
त्या दंव -बिंदुना ओंजारीत गोंजारीत
त्यांना त्यांनी आपलेसे केले.
=================


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.07.2022-बुधवार.