मदहोश

Started by शिवाजी सांगळे, July 20, 2022, 05:04:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मदहोश

गाणे थेंबा थेंबाचे मुक्त गुंजते सभोवताली
पाकळी पाकळी होत जाते फुलांची ओली

होता बेभान स्पंदने त्या विखुरल्या दवांची
फुलांसंगे गंधीत मग हवाही मदहोश झाली

भारावल्या फांद्या नव्या ओलेत्या ओझ्याने
हिंदोळे घेती अलगद वरती आणिक खाली

फडकावित पंख आपुले एक चुकार पक्षी
बोलत राहतो शिळ वाजवीत अगम्य बोली

धावत सुटतो निर्झर झुळझुळ खळखळ
पाहण्या कौतुकाने दरीची अथांग खोली

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९