चारोळी पावसाची-क्रमांक-22-अस्तीत्व दंव बिंदूचे

Started by Atul Kaviraje, July 22, 2022, 12:47:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       चारोळी पावसाची
                                          क्रमांक-22
                                      -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     या दंव बिंदूचे अस्तीत्व हे काही काळच असते. परंतु ते येऊन थोडा वेळा का होईना आपल्या अस्त्तीत्वाने सर्व राईस, पर्ण- फुलांस एक समाधान देऊन जातात, एक हर्ष देऊन जातात. असो, अचानक तो स्वैर वारा, पावसाची नांदी घेऊन आला आहे, पावसाला सुरुवात झाली आहे, आणी आता त्या दंव - बिंदुना समजुन चुकले आहे, आपले काही काळापुरते असलेले अस्तिव आता संपुष्टात  येणार आहे. कारण जलाचा राजा , तो सम्राट आला आहे, आम्हाला पितृ-तुल्य तो असा भूवर आला आहे, आता आमचे इथले कार्य संपले, आता या सृष्टीला त्याची गरज आहे. या पाना फुलांना त्याची माझ्यापेक्षा जास्त आवश्यकता आहे, कारण त्यांचा तो जीवन दाता आहे. माझे आता इथले काम झाले आहे, माझा जो काही खारीचा वाटा होता तो मी प्रामाणिकपणे उचलला. आता मला या पावसात विलीन व्हायची वेळ जवळ आली आहे, माझे अस्तीत्व त्याच्यात सामावण्याची वेळ आली आहे. ये पावसा, ये तुझे स्वागत आहे. आणी पहाता पहाता, ते दंव- बिंदू आपले पहाटेचे नेक काम करून त्या पर्जन्य-बिंदूमध्ये विलीन झाले.

      अस्तीत्व दंव बिंदूचे
     -----------------
आज आनंद होतोय आम्हा
जीवन होते अल्प-काळ आमचे
त्या महा-शक्तीत होताना विलीन
झुगारून दिलंय सर्वस्व अमुचे.
================


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.07.2022-शुक्रवार.