वादळातील फुल

Started by mkapale, July 26, 2022, 11:45:53 AM

Previous topic - Next topic

mkapale

काळ्या ढगांनी अन त्या विजांनी
सगळं भोवताल केलंय भयावह
जोरदार सरी जणू चाबकासारख्या
ए फुला सांभाळ..बेफाम आहे प्रवाह

निसर्गाच्या रंगबिरंगी पटलावर
तुझ्यासारखे नाजूक अनेक आहेत
सगळ्यांना निराळं बनवतांना त्याने
फुल आणि काटे एकत्रच गोवले आहेत

कळीपासून होतांना सुरेख फुल
तुला नजरा चुकवत वाट चालावी लागते
का एकत्र वाढणाऱ्या सगळ्यांमधील
काहींची नजर तुझ्यासारख्यांना लागते

अजूनही काही...गुंतलेत तुला चुरडण्यात
तुला सुंदर जीव नाही तर खेळ समजतात
अजूनही नाही..डोळस झालेत काही
तुझ्या घावात स्वतःला बलवान समजतात

तू जोवर फुलत आहेस मोहक आहेस
तोवर जपून एक एक पाऊल टाकत रहा
आपले जपतील सांभाळ करतील
बाहेत मात्र जगतांना थोडे सावध रहा

-Milind Kapale