पुढचे पाऊल

Started by mkapale, July 26, 2022, 11:55:17 AM

Previous topic - Next topic

mkapale

सागराच्या किनाऱ्यावरच्या लाटा
तश्या आठवणी येत जात असतात
जे दूर निघून गेले तेही येतील का
येणाऱ्या लाटा नेहेमीच आशा देत जातात

जे गेले त्यांचे येणे मात्र उल्कांसारखं
कधीही त्या उलट्या येत नसतात
मन का मग जे आहेत तारे सोबत
पाहून त्यांना सुखात नाही राहात

नव्या पालव्या उमेद देत असतांना
काही गुंतलेले मूळ पाय बांधून असतात
दुःख्खाचे पाश डोळे ओलावून
दिव्यामागच्या अंधारात घेऊन जातात

मावळत्या सूर्यासारखे विलोभनीय
केवळ सुरेख आठवणीच जपाव्यात
उगवत्या सूर्यासारखे गेले ते मागे सोडून
रोज नव्या दिशा आशेने शोधाव्यात

दुःख्ख आपल्या सावलीसारखे असते
कमी जास्त असले तरी कायमचे नाही जात
आपण मात्र समोर बघत चालत राहावे
व्यर्थ आहे मागे वळून केलेले सावलीचे मोजमाप

- Milind Kapale