कविता पावसाच्या-कविता-सहावी-पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण….

Started by Atul Kaviraje, July 27, 2022, 01:12:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "कविता पावसाच्या"
                                         कविता-सहावी 
                                     -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वेगळाच फील सगळ्यांच्या मनात असतो. विशेषतः पावसाळ्यात रोमँटिक वातावरण अधिक प्रमाणात दिसून येते. पाऊस सुरू झाला की, घरात कांदाभजी आणि पावसाळा कविता (Rain Poems In Marathi), खिडकीत बसणं हे एक समीकरणच आहे. पहिला पाऊस सुरू झाल्यावर पहिला पाऊस कविता (Marathi Kavita On Nature And Rain) ही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मराठी पावसाळी कविता (Marathi Poem On Rain) ही पावसाळ्यात मनाला अधिक भावते. पाऊस कविता म्हटलं की आपल्याला मराठीतील अनेक कविताही आठवतात. अशाच काही पाऊस कविता (Rain Poems In Marathi) खास तुमच्यासाठी. मस्तपैकी पावसाळा सुरू झाल्यावर आपल्या जोडीदाराचा हात हातात घ्या, चहाचा घोट आणि पावसाळी कविता हे उत्तम समीकरण जमवून आणा आणि पावसाचा आनंद घ्या!

                         "पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण...."
                        -----------------------------------------


पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण....
एकाच छत्रीत कणीस खात मनसोक्त आनंद
समुद्रकाठी जाऊन येणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श
तुझ्या जवळ असण्याने येणारी शिरशिरी
न सांगताही वाफळलेली कॉफी तू माझ्यासाठी विकत घेणं
आजूबाजूला बसलेल्या लोकांची पर्वा न करता एकमेकात गुंतून जाणं
न बोलता फक्त त्या पावसाची मजा घेणं
न बोलता तू मला आणि मी तुला समजून घेणं
आता आठवणीतल्या तुला जपूनही तू माझं असणं
मला कधी तुझ्यापासून दुरावू नाही शकलं
पण पाऊस असा आला की फक्त तुझं असणं जास्त गरजेचं....
पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण....

--कवयित्री -दीपाली नाफडे
------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                    ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.07.2022-बुधवार.