चारोळी पावसाची-क्रमांक-25-छत्री आणि पावसाची मैत्री

Started by Atul Kaviraje, July 28, 2022, 01:04:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       चारोळी पावसाची
                                          क्रमांक-25
                                      -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं  चारोळीकार , हा  वास्तव -वादी  आहे ,व्यावहारिक  आहे , प्रापंचीकही  आहे  , हे  या  प्रस्तुत  चारोळीतून  दिसत  आहे . साधारणतः  पावसाची  लक्षणे  दिसून  येताच , सारेजण  छत्री  खरेदी  करण्यास  बाजIरी  धाव  घेतात , जेणेकरून  पावसापासून  संरक्षण  व्हावे . येथे  तो  छत्रीची  आणि  पावसाची  अशी  काही  सांगड  घालत  आहे , की  पावसाचे  अन  या  छत्रीचे  जणू  काही  मैत्रीचेच  घट्ट  नाते  आहे . कारण  या  छत्र्या  वर्षभरात  काही  बाजारात  दिसून  येत  नाहीत . अन  जेव्हा  जेव्हा  पावसाळ्याच्या  दिवसात  पाऊस  अवतीर्ण  होतो , तेव्हाच त्यांची  रेलचेल  दिसून  येते . थोडक्यात , या  पावसाचे  अन  छत्रीचे  असे  दर  वर्षाकाठी  येणारे , दर -वर्षी  वर्षा  ऋतूत  दिसून  येणारे  हे  अतूट , घट्ट  नाते  अवर्णनीय  असते .

     पुढे  हा  चारोळीकार , या   उपरोक्त  छत्री -पावसाच्या  नात्याचा , मैत्रीचा  संबंध  हा  आपल्याशी  अन  आपल्या  प्रेयसीशी  जोडू  पहात  आहे . कारण  जशी  ही  छत्री  पावसाची  जिवलग  मैत्रीण   असल्याचे  तो  सांगतो , तशीच  ती  आम्हा  दोघांचीही  जिवलग  मैत्रीण  आहे , असेही  तो  सांगतो .कारण  ही  छत्री  जवळ  असल्याशिवाय , पडणाऱ्या  पावसात  आम्हा  दोघांची  जवळीक  कशी  बरं  होईल , दोघांनाही  आवडणारा  एकमेकांचा  सहवास  कसा  बरं  साधता  येईल , तर  तो  छत्रीमुळेच . ही  छत्रीच  तर  आम्हा  दोघांना  एकमेकांच्या जवळ  आणते . दोघांचंही  मनातले  भाव , प्रेम -भाव  समजण्यासाठी  छत्री  हे  उत्तम  साधन  आहे, असं  चारोळीकारास  वाटत .

     आणि  तो  मनभावी  पाऊस , मनातले  सर्व  काही  जाणणारा  पाऊस , हे  सर्व  पहात  असते . तो  असतो  निशब्द , पण  आपल्या  पडण्यातून  तो  सर्व  काही  सांगून  जातो . तो  म्हणतो , जशी  माझी  आणि  या  छत्रीची  साथ , सोबत  आहे , तशीच  तुमचीही  आहे . माझ्या  आणि  छत्रीच्या  मैत्रीचे  तुम्हीही  एक  स्वरूप  आहेत . आमची  मैत्री  जशी  वर्षानुवर्षे  टिकून  आहे , आमचे  हे  घट्ट  नाते  जसे  वर्षानुवर्षे  अIणिकच  दृढ  होत  जातंय , तद्वतच , तुमचीही  मैत्री  टिकून  राहावी , नव्हे  तर  ती  वृद्धिंगत  व्हावी , अशी  माझी  इच्छा  आहे . आणि  हा  दुवा  सांधणारी , तुम्हा  दोघांना  जवळ  आणणारी , तुमचे  प्रेम -संबंध  अधिकच  दृढ  करणारी , ही  छत्री  तुम्ही  कायम  तुमच्या  सोबत  ठेवा , कारण  मी  येताच  ही  छत्री  असा  एकच  दुवा आहे  जो  तुम्हाला  जोडतो ,एकत्र  आणतो , तुम्हा  दोघांना  एक  करतो. म्हणून  या  छत्रीला  कधीही  दुरावा  देऊ  नका , ती  सतत  सोबत  बाळगा , तिची  साथ , संगत , कधीही  सोडू  नका . कारण  ती  एक  आणि  एकच  तुमच्या  प्रेमासही  कारणीभूत  आहे . तिला  तुम्ही   आपली  सखी , स्नेही , मैत्रीण  माना .

        छत्री आणि पावसाची मैत्री
       -----------------------
जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे
तसेच काही नाते तुझ्या माझ्या मैत्रीचे
पाऊस येतो आणि जातो,
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.
=====================

--नव-चारोळीकार
----------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मन माझे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.07.2022-गुरुवार.