चारोळी पावसाची-क्रमांक-26-पाऊस छत्री आणि प्रेम

Started by Atul Kaviraje, July 30, 2022, 01:00:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      चारोळी पावसाची
                                         क्रमांक-26
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं  चारोळीकार , या  प्रस्तुत  चारोळीतून , पाऊस , प्रेम  आणि  छत्री  यांची  उत्तम  सांगड  घालू  पहात  आहे . या  चारोळीतील  प्रेयसीचे  आपल्या  प्रियकरावर  अत्यंत  मनापासून  प्रेम  आहे . तो  तिला  आवडतो , तसं  तीही  त्याला  आवडते . त्याचे  प्रेम  गेली  बरेच  दिवस  हे  फुलतंय , खुलतय . येणारे  सर्व  सर्व  ऋतू  हे  त्यांच्या  प्रेमाचे  साक्षी  आहेत . अगदी  हा  मनस्वी  पाऊस  देखील . आणि  हा  वर्षातील  एकाच  असा  ओला  ऋतू  आहे , की  जो  सर्वांच्या  मनाबरोबर , या  दोन  प्रेमींच्याही  मनात  प्रेमाचा  ओलावा  निर्माण  करतो .

    तर  या  चारोळीकाराची  कथित  नायिका ,प्रियकराची  प्रेयसी  त्या  प्रियकरा  एवढीच  आतुरतेने  पावसाची  वाट  पहाते . या  पडणाऱ्या  पावसात  एकमेकांना  भेटण्याचा , एकमेंकासोबत  वेळ  घालविण्याचा ,एकमेंकासोबत  राहण्याचा  एक  काही  वेगळाच  आनंद  या  दोघांना  मिळतो . मग  ही  दोघे  या  पावसात  हातात  हात  घालून , रस्त्यावरून  सावकाश  रेंगाळती  पावले  टाकीत , भविष्याची  स्वप्ने  रंगवीत  फिरू  लागतात . त्यांना  तेव्हा  कशाचेही  भान  नसते . ती  एकमेकांत  अशी  गुंतून  असतात .

     पण  मुख्य  मुद्दा  सांगायचा  राहिला , तो  म्हणजे  छत्रीचा . सर्वसाधारणतः  पावसाची  लक्षणे  दिसताच , कुणीही  छत्री  घेऊन  घराबाहेर  पडेल . पण  ही  प्रेयसी  कसली  चतुर  हो . या  नवं -चारोळीकाराने  तिच्या  चातुर्याचे  वर्णन  अगदी  बखुबी  केले  आहे . तो  म्हणतो , की  तिला  महिताहे , आपल्याला  भेटायला  येणारI  आपला  प्रियकर , या  पावसात  नक्कीच  छत्री  घेऊन  येणार . आणि  मला  या  अश्या  ओल्या , चिंब  अवस्थेत  पाहून , माझ्याकडे  छत्री  नसल्याचे  पाहून  तो  नक्कीच  मला  त्याच्याबरोबर  छत्रीत  घेणार . मला  भिजताना  पाहून  तो  मला  छत्रीत  घेऊन  जवळ  घेणार . आणि  त्याची  हीच  तर  जवळीक , त्याचा  स्पर्श  मला  हवाय . आणि  या  निमित्ते  आमच्या  प्रेमाचा  अंकुर  फुलवण्यास  ही  छत्री  आणि  पाऊस  आम्हा  दोघांनाही  एक  प्रकारे  साहाय्य  करणार .

  पाऊस छत्री आणि प्रेम
---------------------
मी मुद्दामच छत्री आणत नाही
पाऊस येणार म्हणून
मला भिजताना पIहिले तर ,
तू छत्रीत घेणार म्हणून.
==============

--नव-चारोळीकार
-----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मन माझे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                 -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.07.2022-शनिवार.