चारोळी पावसाची-क्रमांक-28-अश्रूंचा पाऊस

Started by Atul Kaviraje, August 03, 2022, 01:00:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       चारोळी पावसाची
                                          क्रमांक-28
                                      ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

    नवं -चारोळीकाराने  या  चारोळीच्या , आपल्या  प्रेयसीच्या  डोळ्यांतील  अश्रूंची  उपमा  ही   पावसाच्या  पाण्याशी  केल्याचे  स्पष्टपणे  दिसत  आहे . त्याच्या  चारोळीतील  नायकाचे , प्रियकराचे त्याच्या  प्रेयसीवर  अतोनात  प्रेम  आहे . तिला  जराशीही  झालेली  दुखापत  त्याला  सहन  होत  नाहीय . तो  तिला  फार  जपतोय . एखाद्या  लहान  मुलासारखी  तिची  काळजी  वाहतोय . जराश्यIही  कारणाने  तिच्या  डोळ्यात  अश्रू  आलेले  त्याला  पाहवत  नाहीत . तो  म्हणतोय  कि  हे  प्रिये , तू  तुझ्या  अश्रुना  जप , त्यांना  असं  वाया  घालवू   नकोस . ती  माझ्यासाठी  अनमोल  रत्नेच  आहेत . आणि  यदा न कदा जर  ती  बाहेर  पडलीच , तर  त्यांना  मी  एखाद्या  हिऱ्याप्रमाणे  जपेन . ज्याप्रमाणे  हिरे -पIरख्याला  हिऱ्याची  पारख  असते , तद्वतच  मी  तुझा  हिरा -पारखी  होऊन   ही  तुझी  मौल्यवान  अIसवे  जपून  ठेवीन , त्यांना  जतन  करीन .

     पुढे  या  नवं -चारोळीकाराने  आपल्या  प्रियेच्या  आसवांना,  पडणाऱ्या  पावसाची  उपमा  दिली  आहे . तो  म्हणतोय , कि  सखे  बाहेर  पाऊस  पडतोय , अविरत  पडतोय , त्याची  संततधार  लागली  आहे . आणि  आत  हा   तुझा  हा  अश्रूंचा  पाऊस , आसवांच्या  धारा  अविरत  वाहताहेत . त्या  सुद्धा  त्या  बाहेर  पडणाऱ्या  पावसाच्या  पाण्याप्रमाणेच  किमती  आहेत , अमूल्य  आहेत , मौल्यवान  आहेत , त्यांना  तू  असं  व्यर्थ  दवडू  नकोस . पहा  आता  तुझं  रडणं  थांबवं , तुझ  हे  दुःख  दडव , तुझ  मन  शांत  कर . कारण  हे  तुझे  रडू  पाहून , नकळत  माझेही  डोळे  पहा  कसे  पाण्याने  भरून  आलेत . आणि  थोड्याच   वेळात  माझ्याही  डोळ्यांतून  गंगा -यमुना  वाहण्यास  सुरुवात  होईल . तुझे  हे  अश्रू  आता  माझेही  सोबती  होऊ  पाहत  आहेत . माझ्या  डोळ्यांवाटे त्या  तुला  जाणवू  लागतील .   

          अश्रूंचा पाऊस
         --------------
तू दिलेल्या अश्रुना
हिऱ्यासारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.
==================

--नवं -चारोळीकार
-----------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मन माझे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.08.2022-बुधवार.