कविता पावसाच्या-कविता-सोळावी-दरवर्षीप्रमाणे यंदाही तो मनसोक्त बरसला

Started by Atul Kaviraje, August 06, 2022, 01:43:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "कविता पावसाच्या"
                                        कविता-सोळावी 
                                     ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     पुन्हा कालचा पाऊस म्हटला की आठवणी जमा होतात आणि मग पावसाच्या धारांबरोबर त्या आठवणीही बरसू लागतात. अशाच काही कालच्या पावसाच्या आठवणी. ग. दि. माडगूळकर आणि अशा साहित्यातील नावाजलेल्या कवींच्या काही पाऊस कविता.

                          "दरवर्षीप्रमाणे यंदाही तो मनसोक्त बरसला"
                         --------------------------------------

दरवर्षीप्रमाणे यंदाही तो मनसोक्त बरसला,
जमिनीशी मिलन झाल्याच्या आनंदात हलकेच हसला
याही वर्षी दरवळला मातीचा सुगंध,
थंडगार वाऱ्याच्या स्पर्शाने शहारले सर्वांग
यंदाही नकळत तिच्यासाठी चार ओळी स्फुरल्या,
मनातल्या भावना अलगद ओठांवर तरळल्या
ओठांवरील शब्द लागलीच कागदावर उतरवले,
तिच्यापर्यंत पोहचवण्यासाठी ते लिफाफ्यात बंद केले
बरेच महिने तिच्याशी संवाद न झाल्यामुळे मन थोडे उदास होते,
मात्र आता हातातल्या लिफाफ्याने मनाला पुन्हा प्रफुल्लित केले होते
तडक उठलो, दारामागे लटकवलेली छत्री घेतली,
पत्र छातीशी कवटाळलेआणि पावलं पोस्टाकडे वळवली
मनात थोडीशी धाकधुक होती, आता तरी तिचा राग जाईल का याची चिंता होती
दूर सारुन साऱ्या विचारांना, प्रसन्न मुद्रेने दरवाजा उघडला,
इतक्यात तिच्या गावचा पाहुणा लग्नाची पत्रिका घेऊन उंबऱ्यात धडकला.

--कवी-वेद बर्वे
--------------

संकलक-दीपाली नाफडे
---------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .पॉप xo.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.08.2022-शनिवार.