चारोळी पावसाची-क्रमांक-30-आठवणींची विरघळ

Started by Atul Kaviraje, August 07, 2022, 01:48:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        चारोळी पावसाची
                                           क्रमांक-30
                                       ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --पावसाचे  दिवस  आहेत . प्रस्तुत  चारोळीतील  नायकास , प्रेमीस  पाऊस  अपेक्षित  आहे . कारण  या  पावसातच  केव्हातरी  त्याची  आणि  त्याच्या  प्रियेची  भेट  घडली  होती . त्या  भेटीचे  एका  सुंदर  प्रेम -रोपात  आणि  मग  कालांतराने  एका  विशाल  प्रेम -वृक्षात  रूपांतर  झालं  होतं . म्हणून   प्रत्येक  पावसाळयात  ढग  भरून  आले  की  प्रेमीला  त्याच्या  प्रेयसीची  प्रकर्षाने  आठवण  होते , ओढ  निर्माण  होते , यात  आश्चर्य  ते  काय  ? यंदाही  तो  या  पावसाळ्यात  तिची  वाट  पाहत  आहे .

     नवं -चारोळीकाराने  आपल्या  नायकाच्या  हतभागी , अभागी  मनःस्थितीचे  यथार्थ  वर्णन  केले  आहे . झालं  असं , की  काही  कारणास्तव  तिचे  आणि  त्याचे  प्रेम -पाश  हे  विभक्त  झाले , वेगळे  झाले . त्या  दोघांना  नकोसा  विरह  सहन  करावा  लागला . त्या  दोघांची  आजही  भेट -गाठ  होतं  नाहीय , यापेक्षा  मोठे  दुर्दैव , करुण  कहाणी  ती  काय  ? तर  हे  पावसाळ्यात  भरलेले  ढग  त्याला  तिची  आठवण  करुन  देताहेत . आता  पाऊस  पडेल , आता  झरझर  पाणी  धरित्रीवर  पडेल , याच  अपेक्षेने  तो  आभाळाकडे  पाहत  आहे . पण  कसचे  काय  ? असं  वाटतं , ते  ढगही  आज  त्याच्यावर  रुसले  आहेत . ते  पाऊस  पाडण्यास  तयार  नाहीत . आणि  नकळत  तिच्या  आठवणींनी  त्याचे  डोळे  भरून  आले  आहेत . आणि  मग  पुसट  झालेल्या  पापण्या -आडून  त्याला  पुढचे  चित्रही  अस्पष्ट  दिसत  आहे , इतकं  की  त्याच्या  प्रेयसीचा  तो  तेव्हाचा  चेहराही  इतका  धूसर  झाला  आहे , की  नीट  ओळखताही  येत  नाहीय . फक्त  तिची  आठवणच   त्याला  येऊन  येऊन  रहात  आहे .

     आता  त्या  पावसाची  वाट  पाहून  तो  न  पडल्यामुळे  त्याचे  बोलणेही  खुंटले  आहे . तो  म्हणतोय , की  हे  प्रिये , तुझी  आठवण  मला  इतकी  सतावत  आहे , मी  माझ्यातच  अंतर्मुख  झालो  आहे . इतकं  की  माझं  बोलणंच  खुंटलं  आहे . आणि  पुढे  उदाहरणादाखल  तो  सांगतोय , जसे  गाईचे  वासरू  तिच्या  आईला  म्हणजे  गाईला  कधीच  अंतर  देत  नाही , गाय  जिथे  जाईल  तिथे  ते  तिच्या  पाठी  पाठी  जात  असते . ते  सतत  तिच्या  सोबत  असते . आपली  तेव्हाची  भेटही  अशीच  होती . तुझ्यावाचून  माझं  पानही  हलत  नव्हतं , आणि  माझ्यावाचून  तूही  राहू  शकत  नव्हती . आपल्या  दोघांनाही  एकमेकांची  तेव्हढीच  ओढ  होती . तू  तिथे  मी , आणि  मी  तिथे  तू  होतीस . सांग  बरं , मी  हे  सारं  विसरणं  शक्य  आहे  का  ? प्रिये , मी  कधी  तुला  विसरणं  शक्य  आहे  का ? नाही  ना , मग  तू  जिथे  असशील  तिथे  सुखी  राहा  !

       आठवणींची विरघळ
      ------------------
ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संIग प्रिये मी तुला कसे विसरू ?
====================

--नवं -चारोळीकार
-----------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मन माझे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.08.2022-रविवार.