करून शृंगार आलीस

Started by amoul, July 13, 2010, 09:38:53 AM

Previous topic - Next topic

amoul

कोणती हि वाट तुझ्या डोळ्यातुनी,
जातो मी हरवूनी, आत जाता क्षणी,
मी सोडवून पाहतो प्रश्न गुंत्यातुनी,
सोडवू पाहता, जाई आणखी गुंतुनी.
.
.
.
.

हे कोणते सुगंधी माळून हत्यार आलीस.
किती काळजांवर देवून वार आलीस.

कश्यास ह्या पदराची उडवीत धार आलीस.
मखमल त्या स्पर्शाचा ठेवून भार आलीस.

कोणत्या परिमळात न्हाऊन अंग आलीस.
बंदिस्त मंदिरांचे उघडून दार आलीस.

का पाडीशी पावलांच्या पाकळ्या जमिनीवरी,
बेचिराख पत्थरांना देऊन आकार आलीस.

एका नजरेच्या कटाक्षी बांधून टाकलेस पुरते,
म्हणतेस "जाऊ दूर" अन होऊन तय्यार आलीस.

निष्काम जगणार्यांचे तोडून आधार आलीस.
प्रीत नावाचा त्यांना देवून आजार आलीस.

आता कुठे निवाले शांततेत मन माझे,
पैंजण, कंकणाचे छेडीत झंकार आलीस.

मुठीतल्या रुमाली बांधून प्यार आलीस.
मौनाच्या भाषेतूनी फुलवीत हुंकार आलीस.

पुरेसा नव्हतो का मी जळालो तुझ्या प्रीती ?,
म्हणून का हा इतुका करून शृंगार आलीस.

.................अमोल

Rahul Kumbhar

mast kavita aahe...ajun kahi shrungarik kavita astil tar post kara...

santoshi.world

awesome ........ very romantic  :)


पुरेसा नव्हतो का मी जळालो तुझ्या प्रीती ?,[/size][/color][/size][/color]म्हणून का हा इतुका करून शृंगार आलीस.