मराठी चित्रपट-चंद्रमुखी- लावणी - चंद्रा

Started by Atul Kaviraje, August 08, 2022, 06:42:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, सध्या गाजत असलेला सुप्रसिद्ध मराठी चित्रपट "चंद्रमुखी",  या चित्रपटातील  अतिशय गाजलेली लावणी, जी गायिली आहे, सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल, आणि या लावणीतील नृत्यांगना आहे, सर्वांची आवडती अशी, अमृता खानविलकर. थोड्याच कालावधीत लाखांनी व्युज मिळवलेल्या या लावणीचे बोल आहेत, " चंद्रा "

                                         "चंद्रा"
                                        -------

थांबला का उंबऱ्याशी
या बसा राजी खुशी
घ्या सबुरीनं विडा
का उगा घाई अशी

इझला कशानं सख्यासजना सांगा
लुकलुकनारा दिवा
वनवा जिव्हारी धुमंसल राया जी
रातभर आता नवा

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा ...चंद्रा

रात रंगी रती रंगूनी ...चंद्रा
साज शिणगारही लेऊनी ... चंद्रा
सूरतालात मी दंगूनी ... चंद्रा
आले तारांगणी ... चंद्रा

सरती ही बहरती रात झुरती चांदन्याची
जीवजाळी येत नाही चाँद हाताला
लहरी याद गहीरी साद जहरी काळजाची
घ्या दमानं हया उधानाच्या इशाऱ्याला
अवघड थोडं राया
नजरेच कोडं राया
सोडवा धिरानं साजना

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा ...चंद्रा

रात रंगी रती रंगूनी ...चंद्रा
साज शिणगारही लेऊनी ... चंद्रा
सूरतालात मी दंगूनी ... चंद्रा
आले तारांगणी ... चंद्रा

===============
मराठी  चित्रपट -चंद्रमुखी
नृत्यांगना -अमृता  खानविलकर
लावणी गायिका -श्रेया  घोषाल
गीतकार -गुरु  ठाकूर
कंपोझर  -अजय  अतुल
डायरेक्टर -प्रसाद  ओक
===============

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगIणी.इन)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.08.2022-सोमवार.