‘खरेसाहेब माफ करा : एवढंच ना?

Started by Vkulkarni, July 13, 2010, 03:34:05 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

श्री. संदीप खरे यांच्या "एवढेच ना!" या नितांतसुंदर कवितेचे विडंबन अर्थात खरेसाहेबांची क्षमा मागुन!

एवढंच ना?
विडंबन करू... एवढंच ना?
आमचं हसं, आमचंच हस्सं..., घेऊन कागद एकटेच लिहू,
एवढंच ना? 

मक्त्याला कोण? मतल्याला कोण? गझलेला अवघ्या वाचतय कोण?
शब्दाला शब्द, प्राचीला गच्ची, यमकाला यमक जुळवत लिहू,
एवढंच ना? 

कवितेला मिटर होतंच कधी? काव्याला व्याकरण होतंच कधी?
शब्दांचे सोस, यमकाचे कोश, तिरकस प्रतिसाद अनुभवत लिहू,
एवढंच ना? 

वाचलंत तर द्याल, तुमचीच 'राय' , टाळलंत तर टाळाल, आम्हाला काय?
स्वत:च कवि, स्वत:च वाचक, स्वत:च समिक्षक होवून लिहू,
एवढंच ना? 

काव्याच्या छंदा, लिहिण्याचा धंदा, लिहीत राहू कुणी वंदा वा निंदा,
काव्याच्या छंदा, कवितेचा धंदा, विडंबन करून जगतोय बंदा,
विडंबन खरे, विडंबन बरे, सगळ्यांच्या खोड्या काढीत लिहू,
एवढंच ना? 

नव-ईडंबनकार ईरसाल 'खोटे' 


Vkulkarni




Bahuli


Vkulkarni


Ravi Padekar