पाऊस इतर कविता-कविता क्रमांक-१-कातर वेळचा गार वारा

Started by Atul Kaviraje, August 10, 2022, 01:06:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        पाऊस इतर कविता
                                         कविता क्रमांक-१
                                       ------------------
मित्र/मैत्रिणींनो,

      "पाऊस इतर कविता", या पाऊस-कविता विषया-अंतर्गत आज ऐकुया, एक पाऊस-तुषार तुषार्त कविता. या कवितेचे बोल आहेत-"कातर वेळचा गार वारा"

                                   "कातर वेळचा गार वारा"
                                  -----------------------

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.

जसे अतूट नाते असते
पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते
तुज माझ्या मैत्रीचे.

पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे
असेच तो सांगतो.
मी मुद्दामच छत्री आणत नाही.

पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.
कोसळणारा पाऊस पाहून.

मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......
तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन.

तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.

पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही.

काय मी बोलू तुला
पुढे गाय मागे वासरू,
संIग प्रिये मी तुला कसे विसरू.

तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.

नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.

पाऊस पडत असताना,
तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा......
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा....

रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.

आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो.

ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.

अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले....
मग क्षण भर मी पाहतच राहिलो...
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले....

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीजानकारी.इन)
                    ------------------------------------------   

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.08.2022-बुधवार.