लावणी-रचना-लावणी-क्रमांक-8-आता वाजले की बारा

Started by Atul Kaviraje, August 10, 2022, 04:47:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         लावणी-रचना
                                        -------------

मित्र/मैत्रिणींनो,

      "लावणी" या विषया-अंतर्गत एक लावणी - रचना मी प्रस्तुत करीत आहे. "नटरंग" या चित्रपटातील बेला शेंडे यांनी गायलेली ही लावणी आहे, व आजही ती वारंवार ऐकली जाते . लावणीचे बोल आहेत-  "आता वाजले की बारा" 

                                       लावणी-क्रमांक-8
                                    "आता वाजले की बारा"
                                   ---------------------

चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटु कवातरी साजणा ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

ऐन्यावानी रुप माझं ऊभी ज्वानीच्या मी ऊंबऱ्यात
नादावलं खुळंपीसं कबुतर ह्ये माज्या ऊरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
ऊगा घाई कशापायी हाये नजर ऊभ्या गावाची

(नारी गं, रानी गं, हाये नजर ऊभ्या गावाची)

शेत आलं राखनीला राघु झालं गोळा
शिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझं मला ऱ्हाईना ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

आला पाड झाला भार भरली ऊभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना

(नारी गं, रानी गं, कसं गुपीत राखू कळंना)

मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताचि ही तुम्ही ऱ्हाऊ द्या ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

===============
गीत – गुरु ठाकूर
संगीत – अजय-अतुल
स्वर – बेला शेंडे
चित्रपट – नटरंग (२०१०)
गीतप्रकार  - चित्रगीत , लावणी 
===============

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-आठवणीतील गाणी-लावणी)
               --------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.08.2022-बुधवार.