मराठी चित्रपट-चंद्रमुखी- प्रेम-गीत - तो चांद राती तेजाळताना

Started by Atul Kaviraje, August 10, 2022, 08:00:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, सध्या गाजत असलेला सुप्रसिद्ध मराठी चित्रपट "चंद्रमुखी", या चित्रपटातील एक प्रेम-गीत. हे गाणे गायिले आहे सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाळ यांनी.  या प्रेम-गीताचे बोल आहेत, "तो चांद राती तेजाळताना"

                                  "तो चांद राती तेजाळताना"
                                 ------------------------

तो चांद राती तेजाळताना
हे प्राण माझे ओवाळताना
का प्रीत वेडी लाजते
श्वासात वेणू वाजते
येतील हाती ते स्वर्ग साती
आजन्म तू साथदे

तो चांद राती तेजाळताना
हे प्राण माझे ओवाळताना

तू जरतारी काठ रुपेरी
मोहरल्या पदराचा
व्याकूळलेल्या या धरणीला
शामल मेघ सुखाचा
जीव उधळला आज तुझ्यावर
टाकूनिया कात रे
येतील हाती ते स्वर्ग साती
आजन्म तू साथ दे

तो चांद राती तेजाळताना
हे प्राण माझे ओवाळताना

============
मराठी  चित्रपट -चंद्रमुखी
गायिका -श्रेया घोषाळ   
कंपोझर  -अजय  अतुल
डायरेक्टर -प्रसाद  ओक
============

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी गाणी.इन)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.08.2022-बुधवार.