ऱ्हास हा भास

Started by @गोविंदराज@, August 11, 2022, 02:07:00 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

सांगावे कसे आणि मांडावे किती ?
आपल्याच मनाशी आपण भांडावे किती ?

व्यथा मांडून जणू व्याकुळ झालो ...
आतल्या आतून खूळ खूळ झालो ...

आत्मा कुजून गेला तरी मी खोटा ठरतो
काळा आड गेल्यास इतिहास मोठा ठरतो ...

जे करावं ते उलटत माझ्या वरती
एवढी रुसलीय का माझ्यावर नियती ?

शब्दांचीही आता मला वाटते भीती
पाहू किती नेहमीच स्वतःची फजिती ?

लाचार जणू मी हतबल झालो ...
जगण्याच्या उमेदीत निष्फल झालो ...

आपलेच दात आणि आपलेच ओठ ...
निसटतंय हातून आयुष्य घोट घोट ....

उघड्या डोळ्याने मला दिसतो माझा ऱ्हास आहे
सत्य असून हि समजावे का मी भास आहे ?

गोविंदराज
१०.०८.२०२२