मराठी चित्रपट सुप्रसिद्ध पार्श्वगायक-जयवंत कुलकर्णी-अष्टविनायका तुझा महिमा कसा

Started by Atul Kaviraje, August 11, 2022, 07:29:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             मराठी चित्रपट सुप्रसिद्ध पार्श्वगायक
                                     "जयवंत कुलकर्णी"
                            -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे तत्कालीन प्रसिद्ध शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडून मिळले. लक्ष्मणरावांनी त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवले. जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फिदा होती की, त्यांनी मंचावर उभे राहून गायलेल्या "हिल पोरी हिला" किंवा "ही चाल तुरू तुरू" या दोन गाण्यांना हमखास "वन्स मोअर" मिळत असे. "सावध हरिणी सावध" हे त्यांचे आणखी एक प्रसिद्ध गाणे. उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा ही त्यांच्या काळची खासियत होती. मराठी चित्रपटगीतांसाठी व भावगीतांसाठी हा प्रयोग त्याकाळी नवीनच होता. जयवंत कुलकर्णी यांनी जी चित्रपट गीते गायली त्यांतल्या बऱ्याच गाण्यांमध्ये "गावरान बाज" ठासून भरलेला असे. आज ऐकुया श्री जयवंत कुलकर्णी आणि इतर गायक यांच्या आवाजात सुप्रसिद्ध मराठी चित्रपट "अष्टविनायक", या चित्रपटातील अतिशय गाजलेले गाणे.

                             "अष्टविनायका तुझा महिमा कसा"
                            ------------------------------

स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरम सिध्दिदाम
बल्लाळां मुरुडम विनायकमढ चिंतामणी स्थेवरम
लेन्याद्री गिरिजात्मजम सुवरदं विघ्नेश्वरं ओझारं
ग्रामो रंजनसंस्थितो गणपती:कुर्यात सदा मंगलम

जय गणपती गुणपती गजवंदना
आज तुझी पूजा देवा गौरीनंदन
कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
काळजात सिंहासन मोधोमाधी गजानन
दोहींकडे रिद्धीसिद्धी उभ्या ललना

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ  घ्यावा भक्तांनी असा

गणपती पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं घेतला वास

गणपती, दुसरा गणपती
थेऊर गावाचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं साऱ्यांनि
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यांनी
रमा बाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातील चिंतामणी
भगताच्या मणी त्याचा अजुनी ठसा

गणपती, तिसरा गणपती
सिद्धिविनायक तुझा सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई  तुझ्या भक्ताला पाव रं
दैत्य मधू कैटभान गाजलं हे नगर
ईष्णूनारायण गाई गणपाती मंतर
राकूस मेलं नवाल झाल टेकावरी देऊळ आल
लांबरुंद गाभार्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भोवती भोवती कलाकुसर
मंडपात मंडपात आरतीला  खुशाल खुशाल बसा

गणपती,  चौथा गणपती
पायी रांजणगावचा देव महागणपती
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन
सूर्य फेकी मूर्तिभर वेळ साधून किरण
किती गुणगान किती करावी गणती
पुण्याईच दान घ्यावं ओंजळ पसा

गणपती पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई जाड मूर्ती
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कापला
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा
चारी बाजू तटबंधी मधी गणाचं मंदिर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा

गणपती सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावर तीरी
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव
दगडमंदी कोरलया भक्तिभाव
रामती इथे रंका संगती राव
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो
लेण्याद्री गणानी पाठी आशीर्वाद केल्या हो
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो
किरपेने गणाच्या शिवबा धाउणी आला हो
खडकात खोदकाम  दगडात मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगडमाती रूपदेवाचं लेण्याद्री जसा

सातवा गणपती राया
महड लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळ देवळाच्या मागं अशे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळ त्यानी बांधल तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कार्य येति हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा

आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावाच्या बल्लाळेश्वर आदिदेव  तू बुद्धिसागर
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा कि पीस

मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघनेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया

=========================
I अष्टविनायका तुझा महिमा कसा I
। गीतकार : जगदीश खेबुडकर ।
। संगीतकार : अनिल अरुण ।
। गायक : अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर  गाडगीळ,
              जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर ।
। चित्रपट : अष्टविनायक ।
=========================

     (साभार आणि सौजन्य-वीकएंड क्लासिक रेडिओ शो-कारवान-सारेगम मराठी)
                      (संदर्भ-आठवले-आणि-साठवले.ब्लॉगस्पॉट.कॉम)
    -------------------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2022-गुरुवार.