मराठी कवी,गीतकार व संगीतकार-सुधीर मोघे-आला आला वारा संगे पावसाच्या धारा

Started by Atul Kaviraje, August 11, 2022, 07:46:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              मराठी कवी,गीतकार व संगीतकार
                                        "सुधीर मोघे"
                             ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     सुधीर मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ८ फेब्रुवारी, इ.स. १९३९ - पुणे, महाराष्ट्र, १५ मार्च, इ.स. २०१४) हे एक मराठी कवी, गीतकार व संगीतकार होते.. सुधीर मोघे हे पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. स्वरानंदच्या सर्व कार्यक्रमांचेही ते अध्यक्ष असत. नाट्य‌अभिनेते श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू. मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात सुधीर मोघे यांचा संचार होता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरली होती. आज ऐकुया, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गीतकार-संगीतकार, श्री सुधीर मोघे यांचे एक सुप्रसिद्ध गीत-"आला आला वारा संगे पावसाच्या धारा"

                           "आला आला वारा संगे पावसाच्या धारा"
                          -----------------------------------

आला आला वारा, आला आला वारा
आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा

नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा

आजवरी यांना किती जपलं जपलं
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा

येगळी माती आता ग येगळी दुनिया
आभाळाची माया बाई करील किमया
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा

=====================
आला आला वारा (१९७५)
गीत -  आला आला वारा 
गायिका - आशा भोसले,अनुराधा पौडवाल,
           आणि कोरस 
संगीतकार - पंडित ह्रिदयनाथ मंगेशकर
गीतकार - सुधीर  मोघे
=====================

                         (साभार आणि सौजन्य-सारेगामा मराठी)
                            (संदर्भ-मराठी सॉंग्स.नेटभेट.कॉम)
                        -----------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2022-गुरुवार.